करणसिंह घुले

नेवासा – नेवासा येथील सदाशिवनगर येथील सदभावना गणेश मंडळाच्या गणपतीची आरती समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. सदभावना गणेश मंडळाची स्थापना येथे झाल्यापासून या मंडळाने उपेक्षित घटकांचा सन्मान करत एकात्मता जोपासण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन डॉ.करणसिंह घुले पाटील यांनी यावेळी बोलतांना केले.
         यावेळी जालिंदर गोरे,अनिल सोनवणे, सदभावना गणेश मंडळाचे पदाधिकारी अभिषेक गाडेकर,इंजिनियर चैतन्य कुलकर्णी,शिवम कानडे,श्रेयस थोटे,अथर्व घोडेकर ऋषी थोटे,रुपेश बेद्रे,अमित विखोना,सुशांत जोशी,अथर्व कुलकर्णी,वेदांत कुलकर्णी,अनुराग वाल्हेकर,आदित्य चव्हाण,प्रणव कुलकर्णी  यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

करणसिंह घुले


    यावेळी बोलतांना डॉ.करणसिंह घुले पाटील म्हणाले की सदभावना गणेश मंडळाने समाजासाठी काम करणारे रुग्णवाहिका चालक,नगरपंचायतचे महिला व पुरुष कर्मचारी,पत्रकार,डॉक्टर, वकील,सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ नागरिक यांचा सन्मान करून त्यांच्या हस्ते आरती करून आगळावेगळा संदेश समाजाला दिला आहे.या निमित्ताने सदभावना वाढीस लावण्याचे काम मंडळाने केले आहे.समाजामध्ये प्रबोधन होईल यासाठी मोठी भूमिका बजावली आहे असे सांगून मंडळाच्या कार्याचे कौतुक यावेळी बोलतांना केले.मंडळाचे मार्गदर्शक अभिषेक गाडेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

करणसिंह घुले
करणसिंह घुले

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

करणसिंह घुले
करणसिंह घुले

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

करणसिंह घुले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *