ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
मटका

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील करजगाव येथे सुरू असलेल्या मटका अड्यावर गुन्हे अन्वेषण विभागाने काल कारवाई केली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी कि सोनई पोलीस ठाण्याचे हद्दीत मिळालेल्या माहितीच्या आधारे येथील एका चौकात पत्र्याच्या टपरी मध्ये प्रमोद मनोज जाधव रा. मुळा कारखाना हा विना परवाना कल्याण मटका नावाचा पैशावर खेळला जाणारा हार जितीचा खेळ खेळताना व खेळविताना मिळुन आला. त्याचे कडुन जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य व बाराशे पन्नास रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. संबधित आरोपी कडे अधिक चौकशी केली असता सोनई येथील बाबासाहेब पाखरे याचे कडे सदरचा मटका देत असल्याचे त्याने कबुल केले. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक सोमनाथ झांबरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादी वरुन वरील दोघां विरोधात गुन्हा र. नं. ३२८/२०२५ , १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मटका

दुसरी कारवाई पानेगाव येथे चौकातील वेशीजवळ असलेल्या एका टपरी मध्ये वसंत दामु जंगले (वय.५०) हा देखील लोकांकडून कल्याण मटका हार जितीचा खेळ खेळताना व लोकांकडून खेळविताना मिळून आला. सदरचा मटका आपण वडाळा येथील पिनु पतंगे याच्या कडे देत असल्याचे सांगितले. त्याचे कडुन मटका खेळण्याचे साहित्य तसेच रोख १४०० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तिसरी पानेगाव येथील पुलाजवळील एका टपरी मध्ये रामभाऊ किसन गायकवाड( वय. ४०) हा विना परवाना मटका खेळ खेळताना व खेळविताना मिळून आला. त्याने देखील आपण मा मटका वडाळा येथील पिनु पतंगे याचे कडे देत असल्याचे सांगितले. त्याचे कडून रोख रक्कम १६०० व खेळाचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोनई पोलीस ठाण्यात वरील सर्व आरोपी विरोधात गुन्हा र नं कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार पोलीस काॅस्टेबल किशोर शिरसाठ, पोलीस काॅस्टेबल बाळासाहेब खेडकर, पोलीस काॅस्टेबल सतिश भवर, पोलीस नाईक सोमनाथ झांबरे यांनी केली.

मटका
मटका

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मटका
मटका
मटका

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मटका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *