समाज आणि शेतकऱ्याची सेवा करण्यात राष्ट्रहित आहे. पद आणि अधिकार हे जनतेच्या सेवेकरीता आहेत. पाटेकर यांनी जबाबदारीने राष्ट्रहित म्हणून केलेली सेवा आदर्शवत ठरते असे प्रतिपादन देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी महंत प्रकाशानंद गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.
सहायक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांच्या सेवापुर्ती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वामी महंत प्रकाशानंद गिरीजी महाराज होते.देवगड संस्थानच्या सभागृहात सहायक गट विकास अधिकारी पाटेकर यांच्या सेवापुर्ती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुरेश पाटेकर व सौ मंगल पाटेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी आमदार मोनिका राजळे, आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार चंद्रशेखर घुले,माजी आमदार संभाजीराव फाटके ,ज्ञानेश्वर देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,माजी सभापती महेंद्र काले,सेवा निवृत्त शिक्षण संचालक दिनकर टेमकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे,गट विकास अधिकारी संजय लखवाल,दिनकर गर्जे, बापूसाहेब पाटेकर,बाळासाहेब धोंडे यांनी भाषणात पाटेकर यांच्या प्रशासकीय सेवेबद्दल गौरवपूर्ण उल्लेख केला.
यावेळी नागेबाबा मल्टीस्टेटचे कडूभाऊ काळे, मंत्रालयातील अवर सचिव अशोक चेमटे,सेवानिवृत्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी मुरलीधर वाघ, सेवानिवृत्त गट विकास अधिकारी संजय दिघे, माजी सभापती बापूसाहेब भोसले येवल्याचे माजी सभापती वसंत पवार ,सचिन कळमकर ,कॉ. बाबा आरगडे, अंकुश काळे, संजय जंगले, माजी उपसभापती देवीदास पाटेकर,अंबादास कळमकर,संचालक काकासाहेब शिंदे,बबनराव भुसारी,विष्णू जगदाळे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संकल्प लोणकर, सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता बाळासाहेब लबडे , उपविभागीय अभियंता आनंद रुपनर, कृषी शास्त्रज्ञ डॉ. शामसुंदर कौशिक, चंद्रकांत हजारी,डॉ.कैलास कानडे,समर्पण फाउंडेशनचे डॉ.करण घुले, कृष्णा पिसोटे,

संदीप खरड,डॉ.शिवाजी शिंदे,अशोक नरसाळे अशोकवायकर भाऊसाहेब सावंत,पी.आर.जाधव, नामदेव शिंदे,भिवाजी आघाव,सोमनाथ कचरे,अजय साबळे,सुभाष कराळे,भीमराज सागडे,दत्तात्रय खाटीक,सतीश निपुंगे,भाऊसाहेब चेके, गोविंद मते,सतिश मोटे, ज्ञानदेव शिंदे, विलास शेळके,मोहन उकिर्डे, आत्माराम खांदवे,गोपीनाथ फसले, शंकर हाडके,अनंता उकिर्डे,महादेव पाटेकर,बाळासाहेब कराड,गणेश कराड यांच्यासह येवला(नाशिक) शेवगाव, राहुरी व नेवासे तालुक्यातील अनेक पदाधिकारी,अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विविध गावचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी, मित्र,सहकारी नातेवाईकासह विविध क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
पाटेकर यांचे जीवनचरित्रावरील माहितीपट आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. बापूसाहेब पाटेकर यांनी संत पूजन केले व सोपानराव घोडेचार व संदीप थोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. देवगड संस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरीजी महाराज यांनी गुरुकुलमध्ये पाटेकर कुटुंबीयांचा सन्मान करुन आशीर्वाद दिला.
डॉ.रेवणनाथ पवार व गणेश महाराज चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.आंनद पाटेकर यांनी आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.