ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
बँक

नेवाशाच्या ठेकेदाराने जागतिक बँक प्रकल्प विभागाला काढले मुर्खात ! १ कोटी ४२ लाख रुपये कामाची वर्क ऑर्डरच दिली गेली नाही याबाबत संबंधित विभागाने खुलासा करावा !

गणेशवाडी – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील खड्डे बुजविण्य काम कमी दरात घेतले मात्र एक कोटी 42 लाख रुपयांमध्ये घेतले खरे मात्र जागतिक बँक प्रकल्प विभागाकडून याची वर्क ऑर्डर काढली गेली नाही याबाबत जागतिक बँक प्रकल्प अधिकाऱ्याने वर्क ऑर्डर का काढली नाही याचा खुलासा करण्याची मागणी करण्यात येत आहे मागील वर्षी सदर ठेकेदाराला अहिल्यानगर ते वडाळा बहिरोबा इथपर्यंत सदर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम 80 लाख रुपयाला देण्यात आले मात्र ठेकेदाराने त्याची मुदत संपत आली असताना सुद्धा कुठेच काम केल्याचे दिसत नाही काही ठिकाणी मुरूम टाकून खड्डे बुजवले आहेत असला प्रकार सुरू आहे मात्र घोडेगाव परिसरातले खड्डे ‘जैसे थे’च…!
सरकारी काम अन् दहा वर्षे थांब’ अशा परिस्थितीत पायाभूत सुविधांची कामं सुरु असताना सरकार दरबारी मात्र ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’, असंच निराशाजनक चित्र पाहायला मिळत आहे.

बँक

अशातच सध्या राज्यामध्ये मराठा आंदोलने सुरू आहे याचा फायदा एका ठेकेदाराने व त्या विभागात कार्यरत असलेल्या त्याच्या पाहुण्याच्या संगणमताने तोटयामध्ये काम घेऊन सुद्धा त्यातून पैसे कमावण्याचा प्रकार उघडीस आला आहे अशा या विचित्र परिस्थितीत भरीस भर म्हणून अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गवरच्या खड्ड्यांनी सध्या मोठा उच्छाद मांडला आहे. याला कारण म्हणजे जागतिक बँक प्रकल्प विभागातल्या अधिकाऱ्यांची उदासीनता, ठेकेदाराचं मतलबी धोरण, या विभागाच्या उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याची पार्टनरशिप अशा घाणेरड्या प्रकारात सामान्य जनतेच्या पैशांचा मात्र मोठ्या प्रमाणात चुराडा होतो आहे. या महामार्गावरचे खड्डे बुजविण्याच्या कामात नेवाशाच्या ठेकेदाराने जागतिक प्रकल्प विभागाला अक्षरशः मुर्खात काढलंय. या ठेकेदाराने तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचं काम कमी दराने घेऊनदेखील चक्क 80 लाख रुपये कमावले आहेत.

बँक


अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर वडाळा बहिरोबापर्यंतचे खड्डे बुजविण्याच्या या कामावर तब्बल सव्वा दोन कोटी रुपये खर्च होऊनदेखील छत्रपती संभाजीनगर महामार्गच्या घोडेगाव परिसरासह सर्वच ठिकाणचे खड्डे ‘जैस हे थे’च आहेत. विशेष म्हणजे या कामावर ज्यांनी देखरेख ठेवायची ते उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता एकमेकांचे नातेवाईक असून या कामात त्यांची भागीदारी (पार्टनरशिप) असल्याची जोरदार चर्चा नेवासे तालुक्यात ऐकायला मिळत आहे.
सव्वादोन कोटी रुपयांचं अंदाजपत्रक असलेल्या या महामार्गाचे काम कमी दराने म्हणजे १ कोटी ९३ लाख ८८ हजार ४९३ रुपये यावर १८ टक्के जीएसटी असे धरुन २ कोटी २८ लाख ७८ हजार ४२१ रुपये खर्चाचं हे काम या ठेकेदारानं कमी दराने घेत तब्बल 80 लाख रुपये कमविण्याची किमया करून दाखवली आहे या महामार्गावरचे खड्डे मात्र थातूर मातूर म्हणजे अतिशय निकृष्ट पद्धतीने बुजविण्यात आले आहेत. कारण थोड्याशा पावसाने ते खड्डे वाहन चालकांना पुन्हा एकदा खरं आणि घाणेरडं रुप दाखवू लागले आहेत.

बँक

हा सर्व गंभीर प्रकार असून जागतिक बँक प्रकल्प विभागाचे अधिकारी याची दखल घेणार आहे की नाहीत, जनतेच्या या पैशांची उधळपट्टी थांबणार आहे की नाही, या प्रश्नांची उत्तरं मात्र कोणाकडेच नाहीत. जागतिक बँक प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी यामध्ये लक्ष घालून सदर प्रकरण काय कारवाई करण्यात किंवा ठेकेदार आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार का तोट्यामध्ये काम घेऊन सुद्धा 80 लाख रुपये कमावणाऱ्या ठेकेदाराबद्दल तालुक्यामध्ये चर्चा घडत आहे. एवढे होऊन सुद्धा सदर विभागाला परत टेंडर काढावे लागत आहे. या विभागांमध्ये चाललंय तरी काय कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही सगळे पाहुणेरावळे जमा झाले की काय असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे

बँक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बँक
बँक
बँक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बँक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *