ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
पुरस्कार

गंगापूर तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा ममदापूर (केंद्र-जामगाव,ता. गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथील उपक्रमशील व कार्यतत्पर शिक्षक श्री. संदीप तुकाराम काळे यांना सन 2025 या वर्षाचा जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचा “आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर झाला आहे.

काळे सरांची प्रथम नेमणूक जि.प. प्राथमिक शाळा नवाबपूर येथे झाली.येथे त्यांनी पटसंख्या वाढ, गुणवत्तावृद्धी, शिष्यवृत्ती परीक्षा यात उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या पुढाकाराने नवाबपूर गावाला संत गाडगेबाबा निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त झाला. तसेच गुणवत्ता विकास अभियानात शाळेला तालुक्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून दिले.
या ठिकाणी त्यांनी कुटुंब कल्याण कार्यक्रमात मोलाची कामगिरी केली. शंभर टक्के पटनोंदणी उपस्थिती व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना एक आगाऊ वेतन वाढ देखील मिळाली होती.

पुरस्कार

यानंतर बाबरगांव शाळेत बदली झाल्यानंतर तेथील शाळेला आयएसओ मानांकन मिळवून देण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. परिसरातील कंपनीमार्फत तसेच गावाला सोबत घेऊन समाज सहभाग देखील त्यांनी मिळवला होता. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी म्हणून कोकमठाण येथील आत्ममलिक विद्या मंदिर मार्फत दरवर्षी स्पर्धा परीक्षेचे आयोजन सरांमार्फत करण्यात येत होते.

सध्या ममदापूर शाळेत कार्यरत असलेले संदीप काळे सर, येथे शाळेचा सर्वांगीण विकास साधत आहेत. एकेकाळी एकही झाडे नसलेली शाळा आज १२०० झाडांनी नटलेली असून “गुणवत्ता एक्सप्रेस” म्हणून ओळखली जाते.

गावातील तरुण व सहकारी शिक्षकांना सोबत घेऊन त्यांनी शाळेचा भौतिक, सामाजिक आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास घडवून आणला. “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानात ममदापूर शाळेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

पुरस्कार

शैक्षणिक उपक्रम, भौतिक विकास,व्यसनमुक्ती, सांस्कृतिक कार्यक्रम, शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणणे,आदी कामांसोबत शाळेच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी स्वखर्चाने शाळेच्या नावाची कमान त्यांनी दिली. तसेच वेळच्यावेळी सहकारी शिक्षकांना सोबत घेऊन स्वखर्चाने व समाज सहभाग घेऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सतत झटत असतात. सर्वधर्मसमभाव या मूल्यांची रुजवणूक होण्यासाठी सर्व सण विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी ममदापूर शाळेत सरांच्या माध्यमातून साजरे होतात..
सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक,सांस्कृतिक या विविध क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून पंचक्रोशीत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गावाचे नाव उंचावल्यामुळे ग्रामस्थांमध्येही आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

पुरस्कार
पुरस्कार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पुरस्कार
पुरस्कार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पुरस्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *