नेवासा – सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठा मार्फत जून २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता (सेट) परिक्षेत सहाय्यक प्राध्यापिका कुमारी पूजा धर्मनाथ पालवे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पालवे यांनी रसायनशास्त्र विषयात पात्रता मिळवली आहे. अहिल्यानगरच्या न्यू आर्टस् महाविद्यालयातून त्यांनी मास्टर डिग्री मिळवली असून सध्या त्या नगरच्या सारोळावस्ती येथील विश्वभारती अकॅडमी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत.

नगरच्या भिंगार काँम्प पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार धर्मनाथ पालवे यांच्या त्या कन्या आहेत.
या परिक्षेसाठी प्राचार्या सौ. वैशाली नवले व उप प्राचार्य रूपाली साखरवडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विश्वभारती महाविद्यालयाच्या वतीने पालवे यांचा सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.