नेवासा –आज नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थानश शनिशिंगणापूर येथील गेल्या कित्येक वर्षापासून होत असलेल्या कोट्यावधीच्या भ्रष्टाचार संदर्भात वेळोवेळी आंदोलने उपोषणे करून देवस्थान मधील भ्रष्टाचाराचा संदर्भात वेळोवेळी आवाज उठून भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांनी हा मुद्दा कागदोपत्री विधान सभेपर्यंत वेळोवेळी उपस्थित करून समोर आणला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष घालून या घोटाळ्यासंदर्भात चौकशी समिती स्थापन करून कारवाईचे आदेश दिले

त्या संदर्भात चौकशीची गतिमानता व ॲप घोटाळ्यात आढळलेले दोषी यांच्या संदर्भात आज अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथ घार्गे साहेब यांची आज अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली त्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की देवस्थान मधील घोटाळ्याच्या तपासाला वेग देऊन येणाऱ्या आठ दिवसांमध्ये भ्रष्टाचारांवर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही जिल्हा पोलीस निरीक्षक सोमनाथ घार्गे साहेबांनी खात्री दिली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.