सोनई – नेवासा तालुक्यातील मुळा रुरल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी सोनई या महाविद्यालयात शिक्षक दिनाचे औचित साधून ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख संस्थेचे सचिव यू एम लोंढे व सहसचिव डॉ व्ही.के देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजचे प्राचार्य प्रशांत घुले यांच्या हस्ते बुक बँकेचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी मोफत पुस्तके वाटप करण्यात आले या प्रसंगी शिक्षक दिनाच्या अवचित साधून भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला हार घालून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी प्राचार्य प्रशांत घुले यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना सांगितले की या बुक बँकेमुळे ग्रामीण भागातील मागासवर्गी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे यामधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास फायदा होणार आहे यामध्ये मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख सातत्यपूर्ण विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील असतात या वेळेस विद्यार्थिनी टाळाच्या गजरात बुक बँकेचे स्वागत केले यावेळी सूत्रसंचालन प्रा.जंगले यांनी केले आभार प्रदर्शन प्राध्यापिका लाटे मॅडम यांनी केली व यावेळी प्राध्यापिका गडाख प्रा.येळवंडे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.