नेवासा – श्री मोहिनीराज यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष व नेवासा नगर पंचायतीचे नगरसेवक तथा जनतेचे खरे सेवक राजूभाऊ मापारी यांचे निधन झाल्याची दु:खद वार्ता समजताच संपूर्ण तालुका शोकमग्न झाला. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘नावाला नगरसेवक पण प्रत्यक्षात खरे जनसेवक’ अशी त्यांची खरी ओळख होती. जात, पात, धर्म न पाहता प्रत्येकासाठी ते दिवस-रात्र धावून जाणारे, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता किंवा इतर कोणतीही अडचण असो, राजूभाऊंचा मोबाईल नेहमी उपलब्ध आणि त्यांचे पाऊल नेहमीच लोकांसाठी सज्ज असे. पाणीटाकीवर पहाटे हजेरी, तर रात्री वीजेच्या डीपीवर जनतेसाठी धाव, पोलिस स्टेशनपासून शासकीय कार्यालयापर्यंत लोकांचे प्रश्न सोडविण्यात ते अग्रस्थानी असत.

त्यांच्या निधनाने शहराचा आधारवड हरपल्याची भावना नागरिकांमध्ये दाटून आली आहे. अंत्यविधीस उसळलेली गर्दी, हिंदू स्मशानभूमीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांची उपस्थिती, ही त्यांच्या सर्वसमावेशक, लोकाभिमुख कार्याची ठळक साक्ष होती. त्यांनी काम करतांना कधी रात्र दिवस पाहिला नाही तसेच निस्वार्थ असे काम केले.रस्त्यावरून जाताना लहान मुलगा, वयोवृद्ध किंवा महिला—कोणालाही वंदनाविना कधी पुढे न जाण्याचा त्यांचा स्वभाव जनतेच्या मनाला कायम भावत राहिला.त्यांच्या या कामाच्या पद्धतीमुळे नावा प्रमाणेच मनासारखा राजा आणि राजा सारखे मन असे उद्गार येत होते.
त्यांचा प्रत्येक वाढदिवस समाजकार्य करूनच साजरा केला जात असे.यंदा ५५ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात करायचा होता; पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. वाढदिवशीच त्यांचा तेरावा पार पडत आहे, ही बाब जनतेच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली आहे.

राजूभाऊ मापारी यांच्या निधनाने नेवासा शहर व परिसरात पोकळी निर्माण झाली आहे.लोकांच्या मुखातून असा माणूस पुन्हा होणे नाही हीच भावना येत होती,त्यांची ओळख, कार्यतत्परता आणि सर्वसमावेशक जनसेवा लोकांच्या स्मरणात सदैव जिवंत राहिल.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.