ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
जनावर

गणेशवाडी – दिनांक१२ रोजी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोनि किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत सोनई पोलीस स्टेशन हद्दीत घोडेगाव गावचे शिवारातील शेख वस्ती या ठिकाणी फिरोज शेख हा त्याचे साथीदाराचे मदतीने महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरे कत्तल करण्यास मनाई असतांना त्याने काही जनावरे कत्तल करण्याचे उददेशाने आणुन विना चारा पाण्यावाचुन डांबुन ठेवले असुन सदर जनावरे ट्रक मध्ये भरुन कत्तल करण्यासाठी घेवुन जाणार असल्याची माहिती मिळाले होती.

जनावर

सदर माहितीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा येथील पोनि किरणकुमार कबाडी, सपोनि/हरिष भोये, पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, ऱ्हदय घोडके, लक्ष्मण खोकले, गणेश लोंढे, संतोष खैरे, सुयोग सुपेकर, सोमनाथ झांबरे, शामसुंदर जाधव, भिमराज खर्से, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, जालिंदर माने, प्रमोद जाधव, उमाकांत गावडे, अरुण मोरे, सारिका दरेकर, सुवर्णा गोडसे यांची स्वतंत्र तीन पथके तयार करुन सदर पथकासह घोडेगांव ते सोनई जाणारे रोडलगत, शेख वस्ती या ठिकाणी जावुन खात्री करता काही इसम एका ट्रकमध्ये गोवंशीय जनावरे भरतांना दिसुन आले. सदर इसमांकडे जात असतांना जनावरे भरणारे इसम पोलीस पथकास पाहुन पळुन जावु लागले.

जनावर

सदर इसमांचा पाठलाग करुन त्यातील तीन जणांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव विचारता त्यांनी फिरोज रशिद शेख (वय ३६ वर्षे) , रा. घोडेगाव, लाला ऊर्फ अफताब हरुन शेख (वय २८ ) रा. सदर, शुभम बाबासाहेब पुंड (वय २५ )रा. माळी चिंचोरा,. असे असल्याचे सांगीतले. त्यांचेकडुन पळुन गेलेल्या इसमांबाबत विचारपुस करता त्यांनी पळुन गेलेल्यांची नावे भारत भाऊसाहेब शहाराव, रा. फत्तेपुर , (फरार),जुनेद शेख (पुर्ण नाव माहित नाही) रा. मुंगी ता. शेवगाव (फरार) असे असल्याचे सांगितले.

जनावर

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे कब्जामध्ये तेरा लाख रुपये किंमतीची २६ जिवंत गोवंशीय जनावरे, विस लाखांचा एम. एच. ११ सी. एच. ८५९९ या क्रमांकाचा ट्रक असा एकुण तेहतीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरील इसमांविरुध्द सोनई पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३५०/२०२५ महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन १९९५ चे सुधारीत २०१५ चे कलम ५(अ)(ब) ९ सह प्राण्यांना निर्दयतेने वागविणे कलम ३ व ११ प्रमाणे पोलीस नाईक सोमनाथ झांबरे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गावडे हे करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

जनावर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जनावर
जनावर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जनावर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *