नेवासा-श्रीराम जन्मभूमी मंदिर न्यास अयोध्या कोषाध्यक्ष,श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास मथुरा उपाध्यक्ष व गीता परिवाराचे संस्थापक प. पु. स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांची भाजप नेते अनिल पा. ताके यांनी छत्रपती शिवाजी महाराज कथा सोहळा कलंत्री लॉन्स येवला येथे भेट घेऊन त्याना संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ग्रँथराज ज्ञानेश्वरीच्या जयंतीनिमित्त माऊलींच्या पैस खांब प्रतिकृती चे शिल्प स्नेह भेट देऊन आशीर्वाद घेतले व प. पु.स्वामीजींना नेवासा भेटीचे निमंत्रण दिले.

यावेळी प पु. स्वामींजीनी लवकरच श्री क्षेत्र नेवासा ला येऊ असे सांगत त्यांचे जुने सहकारी जेष्ठ नेते दिनकरराव ताके पा. यांच्या तबेतीची काळजीपूर्वक चौकशी करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी गिरीराज व्यास, रामेश्वर कलंत्री,महेश मालपाणी,राहुल देहाडराय,अंबादास सरोदे आदी उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.