नेवासा- येथे संत सेवा संघ पुणे यांच्या वतीने शनिवार दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी दरवर्षीप्रमाणे श्री ज्ञानेश्वरी जयंतीचे आयोजन करण्यात आले. श्री मोहिनीराज मंदिर येथे डॉ.करणसिंह घुले यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करून श्री ज्ञानेश्वरी रचना स्थान पैस खांब मंदिरापर्यंत ज्ञानेश्वरी ग्रंथ रथात ठेवून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ज्ञानोदय इंग्लिश स्कूल नेवासा या विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झालेल्या लेझीम, झांज तसेच वारकरी दिंडी पथकाने नेवासकरांची मने जिंकली.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे संत सेवा संघातील साधकांनी विद्यार्थी व उपस्थित भाविकांना ग्रंथराज ज्ञानेश्वरीची महती सांगितली.

या कार्यक्रमासाठी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे विश्वस्त जंगले काका, डॉ.करणसिंह घुले, शिक्षक रोशन सरोदे, कपिल चिंतामणी,संत सेवा संघाचे साधक, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे कर्मचारी, त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे बँड पथकातील विद्यार्थी व शिक्षक, नेवासा परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.संत सेवा संघाचे मंगेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले तर संजय आखाडे यांनी आभार व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.