गणेशवाडी — नेवासा तालुक्यातील पांढरीपुल ते वडाळादरम्यान अनाधिकृत बस थांब्यावर प्रवाशांची सुटका होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गेल्या अनेक काही दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बस महामंडळाची कुठलीही अधिकृत परवानगी नसलेल्या खाजगी ढाब्यावर जेवणासाठी थांबतात . बस चालक वाहक यांना संबंधीत आगाराकडुन कोणतीही लेखी सुचना नसताना चालक वाहक बिनधास्त बस जेवणासाठी थांबवतात

याचा गैरफायदा ढाबा चालक घेतात संभाजी नगर ते अहिल्या नगर महामार्गावर वडाळ्याजवळील ढाब्यावर जळगाव दौंड भुसावळ आणि आणखी लांब पल्ल्याच्या गाड्या देखील येथे थांबतात या ढाब्यावर. सामोसा वडापाव तीस रुपयास मिळतो त्याची बाहेर कोणत्याही हाॅटेल मध्ये दहा ते पंधरा रुपयाला मिळतो आहे मग येथेच तीस रुपये घेतले जातात तर भेळ पन्नास रूपये तर चहा वीस रुपयांत मिळतो ही प्रवाशांची लूट नाही का वेळ प्रसंगी हॉटेल मालक व प्रवाशांमध्ये हमरी तुमरीचे प्रकार घडले आहेत. मुळात ज्या ठिकाणी या बसेस थांबतात तो ढाबा महामंडळाने अधिकृत परवानगी दिली आहे का मग बस थांबतात कशा संबंधीत बस वाहकाला विचारले असता आम्हाला आगाराकडुन या थांब्यावर थांबण्या विषयी कोणतीही लेखी सुचेना नाही . पण इतर बस थांबतात म्हणून आम्ही थांबतो असे उत्तर मिळाले. प्रश्न असा पडतो ढाबा अधिकृत नाही बस आगाराच्या कोणत्याही सुचना नाही मग अशा प्रकारे प्रवाशांची लुट होतच रहाणार का असा सवाल प्रवासी वर्गामध्ये उपस्थित केला जात आहे .

नेवासा येथून या बस मध्ये बसलेला प्रवासी या अनाधिकृत थांब्यामुळे आपल्या इच्छित स्थळी वेळेवर पोहचत नाही .या बस एक एक तास या ठिकाणी थांबतात .यामुळे बसुन प्रवाशाला मनस्ताप सहन करावा लागतो. बस चालक व वाहकाच्या मनमानीमुळे पुढील प्रवास करण्यासाठी या प्रवाशाला अडचण निर्माण होते. या अनाधिकृत बस थांब्यावर जर बस थांबली तर ड्रायव्हर व कंडक्टर यांना पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात येत असतो. परंतु बस तपासणी करण्यासाठी येणारे अधिकारीच या सर्वांना कारणीभूत आहे. हे असेच जर सुरू राहीले तर एसटी महामंडळ आणखी तोट्यात आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा या अनाधिकृत बस थांब्यावर थांबणाऱ्या बसेस वरती कारवाई करण्याची मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे. मुळात या मार्गावर एकही अधिकृत बस थांबा देण्यात आलेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
एका बस वाहकाने माझे नाव येवू देवू नका या अटीवर कबुल केले की
आमचेच अधिकारी यात गुंतलेले आहेत अगदी खालपासून वर पर्यंत साखळी आहे त्यामुळे काही फरक पडत .

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.