शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी गायकवाड तर उपाध्यक्षपदी भागवत
राजकीय पुढार्यांची हाजीहाजी करण्यापेक्षा शेतकर्यांच्या पोरांनी शेतकर्यांच्या समस्यांवर एकजुट होवुन आपल्या न्यायहक्कासाठी आवाज उठवण्याची गरज असल्याचे प्रतीपादण शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अँड. अजीत काळे यांनी नेवासा तालुक्यातील भालगावात शेतकरी संघटनेच्या आठव्या शाखेच्या उद्घाटन व नियुक्ती कार्यक्रमाच्या वेळी केले.
नेपाळमध्ये सोशल मीडिया बंद झाला म्हणून तेथील तरुणांनी आंदोलन करून देशाची सत्ता उलथून टाकली परंतु भारत देशात आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये विकासासाठी तरुणांनी प्रयत्न करावा. शासनाने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा.

ऊस कापूस कांदा सोयाबीन तूर आधी पिकांना हमीभाव मिळाला पाहिजे याकरिता जीवाचं रान करणार व शेतकऱ्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार असल्याचे काळे यांनी शेतकर्यांना आश्वासीत केले. उपसरपंच बंडू चौगुले सारखे युवक शेतकरी संघटनेकडे आहे याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार काळे यांनी शेतकर्यांना संबोधताना केले.
शेतकरी संघटनेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य दगडू तनपुरे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भालगाव येथील सरपंच दादासाहेब खरात सर यांनी केले. भालगाव येथील शेतकरी संघटनेच्या शाखाध्यक्षपदी संभाजी गायकवाड व उपाध्यक्षपदी संभाजी भागवत यांची सर्वानुमती निवड झाली. अजित काळे यांचे हात बळकट करण्यासाठी शेकडो शेतकरी शेती प्रश्नांसाठी सदैव अजित काळे साहेब सोबत राहणार अशी ग्वाही नूतन अध्यक्ष संभाजी गायकवाड यांनी दिली.

गंगाथडीचा शेतकरी रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, शेती उत्पादन भाव आणि स्थानिक समस्या यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असे गणेश चौगुले यांनी सांगितले. युवा नेते बंडू चौगुले, सोसायटीचे चेअरमन युवराज तनपुरे, धर्मरक्षक गणेश चौगुले, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तूवर, शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष रोहित कुलकर्णी, श्रीरामपूर शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष युवराज जगताप, अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक कार्लस साठे सर, सरपंच खरात सर आदींनी मनोगत व्यक्त केले.
अशोक कारखाना संचालक हनुमंतराव वाकचौरे, बाभळेश्वर दूध संघाचे संचालक वसंत काका शेरकर, कुंडलिक सरोदे, नानासाहेब डवले यांच्यासह भालगावातील मोठा शेतकरी वर्ग उपस्थीत होता.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.