नेवासा तालुक्यातील गिडेगाव अवैध दारू विक्री बंद होण्याबाबत गिडेगाव येथील महिलांनी नेवासा पोलीस स्टेशन तसेच तहसील कार्यालय येथे काही दिवसापूर्वी निवेदन दिले होते.
त्या निवेदनामध्ये मध्ये म्हटले होते की गिडेगाव शिवारातील अवैध दारू धंदे बंद व्हावेत या अवैद्य दारू व्यवसायामुळे शाळकरी मुले, तसेच अनेक महिलांचे पती तसेच अल्पवयीन मुले ही व्यसनाधीन होताना दिसत आहे अनेक महिलांचे संसार या दारूमुळे उध्वस्त झाले आहेत .
तसेच अनेक पुरुष ही व्यसनाधीन होताना दिसत आहे त्यामुळे घरातील वाद-विवाद तसेच महिला वर्गांना मोठ्या प्रमाणात या दारू पिल्याने त्रास होतो आहे या अवैध दारू व्यवसाय संदर्भात याच महिलांनी काही दिवसापूर्वी पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले होते त्याचीही बातमी एस नाईन न्यूज चॅनलने प्रसारित केली होती .

तसेच तहसील कार्यालय येथे तहसीलदारांनाही निवेदन देण्यात आले होते त्याच पार्श्वभूमी वरती आज स्वतः महिला रणरागिनी यांनी दारू व्यवसायिकांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन व ढाब्यावरती जाऊन ढाबे व्यवसायिक हॉटेल व्यवसायिक यांना पोलिसांच्या समवेत सर्व गिडेगाव शिवारातील हॉटेल व्यवसायिकांनाच्या हॉटेल वरती जाऊन स्वतः पाहणी केली व दारू विक्री संदर्भात पोलिसां समवेत त्यांना समजावून सांगितले व दारूमुळे होणारे हानी संदर्भात समजुतीने चर्चा केली त्यांच्या दारू विक्रीमुळे होणारे नुकसान ही त्यांना समजावून सांगितले .
त्या बोलतांनी म्हणाल्या की आपल्या दारू व्यवसायामुळे गिडेगाव शीवारातील अल्पवयीन मुले ही व्यसनाधीन होत आहेत तरीही आपण करत असलेल्या किंवा नसलेल्या दारू विक्री बंद करावी अन्यथा पुढील काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर आपल्या हॉटेल वरती योग्य ती कारवाई करू असा सज्जड दमच त्यांनी हॉटेल व्यवसायिकांना या महिला रणरागिनींनी दिला आहे.

या प्रसंगी कडूबाई अण्णासाहेब कर्डिले , अंजली कल्याण साळुंके,
कविता अरुण ताकवले,संगीता सुरेश गायकवाड,कविता लक्ष्मण साळुंके,ज्योती गायकवाड
सरपंच भगवानराव कर्डिले , नवनाथ शिवाजी साळुंके ,बाळासाहेब साळुंके पोलीस पाटील,
कल्याणराव साळुंके माजी सरपंच,
उत्तमराव गायकवाड माजी सरपंच,
सोपानराव कर्डिले, अरुण ताकवले , माजी सरपंच भाऊसाहेब पंढरीनाथ कर्डिले, कडुबाळ कचरू गायकवाड, सुदाम साळुंके , नेवासा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष भांगे, उपाध्यक्ष उंदरे पाटील, सचिव पुंड पाटील ,नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने घुगे दादा, शेळके दादा ,यावेळी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.