गणेशवाडी — नेवासा तालुक्यातील वाघवाडी (लोहोगाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक संदीप राठोड यांचा निरोप समारंभ पार पडला. १ जून २०१३ रोजी शाळेत रुजू झालेले राठोड यांनी १२ वर्षे कार्य केले. त्यांच्या सेवेला आणि योगदानाला मान्यता देत गावातील पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी नव्याने शाळेत नियुक्त झालेले शिक्षक सुधाकर झिने यांचेही स्वागत व सन्मान या वेळी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव वाघ हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी श्रीमती गीता श्रीमाळ व संगीता सावळे (जि.प. छत्रपती संभाजीनगर) उपस्थित होत्या.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गोरक्षनाथ वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वाघवाडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले राजेश जगताप यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेवन्नाथ पवार यांनी केले.या वेळी गोरक्षनाथ वाघ, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष एकनाथ खंडागळे , जगन्नाथ वाघ, पांडुरंग वाघ, अनिल तवले,बाळासाहेब तवले, सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

