नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील ग्रामस्थांनी पानंद रस्त्यावरील अतिक्रमणाबाबतचे आंदोलन तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित केले आहे.
ग्रामस्थांच्या मते अतिक्रमणामुळे सार्वजनिक वाहतुकीस गंभीर अडथळे निर्माण झाले असून शेतकरी व सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सध्या असलेल्या रस्त्यावर ग्रामपंचायतने ४ वेळा निधी मंजुर केला होता परंतु रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी विरोध केल्याने रस्त्याचे काम होऊ शकले नाही म्हणुन ग्रामस्थांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार यांनी उपधिक्षक भूमिअभिलेख कार्यालय नेवासा यांना तातडीने कार्यवाहीचे पत्र देऊन सदर रस्ता प्रश्न सोडवण्याची शास्वती दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. तथापि, केवळ आश्वासन नको तर प्रत्यक्ष ठोस कारवाई व्हावी अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
या आंदोलनावेळी सरपंच शरद आरगडे, पंढरीनाथ आरगडे, भाऊसाहेब आरगडे किशोर बोधक प्रदीप आरगडे, रामकिसन आरगडे, बाबासाहेब आरगडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, ठोस कारवाई करण्यात विलंब झाल्यास आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

