नेवासा – गोदावरी-प्रवरा नदीपात्रात एका अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील म्हाळापूर गावाच्या शिवारातील गोदावरी-प्रवरा नदी संगमाजवळ एक पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. मयत इसम सुमारे ४० ते ४५ वर्ष वयाचा पुरुष आहे. मयताने निळसर रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, कमरेवर काळ्या रंगाचा बेल्ट आणि गुलाबी रंगाचे अंडरवेअर परिधान केले होते. अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नाही, याबाबत कुणालाही काही माहीत असल्यास नेवासा पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

