गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील पांढरीपुल ते वांजुळी शिवारात खाद्य तेलाने भरलेला ट्रक अचानक लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी कि सुर्यकांत साधु तुरे रा. निलंगा जिल्हा लातुर यांच्या मालकीचा एम एच २४ ए यु ९५५७ क्रमांक असलेला ट्रक हैद्राबाद येथून अकरा टन सातशे किलो वजनाचे तेलाचे बाॅक्स घेऊन गुजरात येथील वापी येथे खाली करण्यासाठी जात होता. पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास तो पांढरीपुल ते वांबोरी जाणाऱ्या रोडवर असलेल्या गुंजाळे शिवारात चडावर आल्यावर अचानक पणे शाॅर्ट सर्किट झाले. त्यामध्ये तो ट्रक मालासह जळुन खाक झाला.

घटनेची माहिती कळताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे, सहाय्यक फौजदार मच्छिंद्र आडकित्ते , पोलीस काॅस्टेबल रामदास तमनर यांच्या सह घटनास्थळी भेट देवुन पहाणी केली. पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.