नेवासा – तालुक्यातील प्रवरासंगम येथे अहिल्यानगर -छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सकाळी नर जातीचा एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक पाहणीत अपघाती कारणामुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आठवड्याभरा पूर्वी प्रवरासंगम लगत टोका- वाशीम येथे विहिरीत पडलेला जिवंत बिबट्या आढळून ऑला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, यापूर्वीही या परिसरात बिबट्यांच्या हालचाली वारंवार दिसून आल्या होत्या.

त्यामुळे स्थानिकांनी वन्यजीवांच्या सुरक्षेबरोबरच ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी अधिक उपाययोजना करण्याची मागणी करत आहे. नेवासा वनपाल अधिकारी व्ही. एम. गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक आर. ए. शिसोदे, डी. जी. धुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन
पंचनामा केला. या प्रसंगी पोलीस कॉन्स्टेबल दहिफळे उपस्थित होते. मृत बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. फोटो काढण्यासाठी झुंबड उडाली होती मात्र वेळीच पोलीस व वनअधिकाऱ्यांनी काही वेळात मृत बिबट्याच्या अंगावर कापड टाकले व नंतर रुग्णवाहिकेमधून नेवाशाकडे पोस्टमार्टमसाठी नेण्यात आले. टोका-वाशीम परिसरात विहिरीत जिवंत बिबट्या आढळला होता व आज प्रवरासंगम येथे मृत बिबट्या आढळल्याने परिसर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने -पिंजरा लावावा अशी मागणी सरपंच अर्चना संदीप सुडके यांनी केली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

