नेवासा | अविनाश जाधव – श्री संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थान नेवासा व जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था माजी विद्यार्थी यांच्या वतीने गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले यांची पुण्यतिथी उत्सवात साजरी करण्यात आली
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले । उद्धरावया आले दीन जनां ॥१॥
ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी । नाम घेता वदनी दोष जाती ||२||
हो कां दुराचारी विषयी. आसक्त । संत कृपे त्वरित उद्धरती ||३||
अखंडित नामा त्यांचा वास पाहे । निशिदिनी ध्याये सत्संगती ॥४॥

या संत नामदेव महाराजांच्या अभंगावर महाराजांनी चिंतन केले, वै घुले बाबा व वै बन्सी बाबा यांच्या जुन्या आठवणीं ढाकणे महाराज यांनी सांगितल्या, तांबे बाबा व घुले बाबा ही राम लक्ष्मणाची जोडी होती,
यावेळी ढाकणे महाराजानी संतांचा महिमा वर्णन केला, संत संगती, गुरु उपदेश यावर हभप ढाकणे महाराजांनी चिंतन केले,
यावेळी उपस्थित महाराज मंडळी किर्तनकार माधव महाराज ढाकणे आळंदीकर, अन्नदान करणारे अनिल महाराज गरुड, गुरुवर्य वेदांताचार्य देवीदासजी महाराज म्हस्के (श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्रीक्षेत्र नेवासा) भगवानजी महाराज जंगले श्रीराम महाराज झिंजुर्के , नंदकिशोर महाराज खरात, गहिनीनाथ महाराज आढाव, सुदामदेव बाबा शास्त्री,
दादा महाराज वायसळ, मृदंगाचार्य बाळकृष्ण महाराज दिघे, चांगदेव महाराज काळे ऋषिकेश महाराज, बाबासाहेब महाराज, गणेश महाराज आरगडे, असणे महाराज ,सचिन महाराज, राम बोचरे महाराज, राम महाराज चोपडे , ज्ञानेश्वर महाराज हजारे, पंडित महाराज, ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा यांचे अध्यक्ष व सर्व विश्वस्त मंडळ तसेच रामकृष्ण आश्रम गोणेगाव विद्यार्थी, श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील विद्यार्थी यावेळी पंचक्रोशीतील वारकरी मंडळी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते

हभप देविदास महाराज म्हस्के यांच्या वतीने ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिण्यासाठी एक महिन्या मध्ये नेवासा मंदिरात वह्या उपलब्ध होणार आहे, व पुढील वर्षी ज्ञानेश्वरी जयंती उत्सवा पर्यत त्या मंदिरात जमा करायच्या आहेत, असा संकल्प हभप म्हस्के महाराज यांनी व्यक्त केला आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

