शेती

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी व परिसरात सध्या परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. मध्यंतरीच्या काळात पावसाने मोठी उघडकीस दिली होती. शेतकऱ्यांनी कसेबसे करत पिक तयार केले होते.दि.१९ रोजी च्या परतीच्या प्रवासाला लागलेल्या पावसाने रात्री १ते चार वाजेपर्यंत चालले या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले. काहींच्या तर घरामध्ये पाणी गेल्याने संसार उपयोगी साहित्य देखील पाण्यात गेले, जनावरे पाण्यातच उभे , काही ठिकाणी तर शाळेच्या चोहोबाजूंनी पाण्याचा विळखा अशी विदारक परिस्थिती गणेशवाडी व परिसरातील झाली होती.

शेती

तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे, ऋषिकेश शेटे तहसीलदार बिरादार, बिडीओ,पिडबल्यु डी चे अधिकारी , स्थानिक तलाठी, कृषी अधिकारी यांनी सोनई, लांडेवाडी, करजगाव, पानेगाव, निंभारी,गणेशवाडी , विठ्ठलवाडी, हनुमान वाडी येथील नुकसान ग्रस्त शेती ची पहाणी करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणुन घेतल्या व तातडीने तहसीलदार, तलाठी यांना सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली. या वेळी किरण जाधव, प्रमोद घावटे,राजु लांडे, सह परिसरातील शेतकरी पहाणी करताना उपस्थित होते.

शेती
शेती

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शेती
शेती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शेती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!