नेवासा – भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा पंधरवडा अभियानअंतर्गत आज अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने हंडी निमगाव त्रिवेणीश्वर महादेव मंदिर या ठिकाणी बांधकाम कामगार योजना अंतर्गत गृहपयोगी, साहित्य भांडेचे वाटप अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील व शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनचे एपीआय आशिष शेळके साहेब व सुलतानपूर पाथरवाला चे सरपंच माननीय पोपटराव पाटील खाटीक यांच्या हस्ते भांडे वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश शेटे यांनी सांगितले की नेवासा तालुक्यातील बांधकाम कामगार नोंदणी अधिक वाढवून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करू. व बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहून तालुक्यातील बांधकाम कामगार संघटित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले.याप्रसंगी कामगार आघाडीचे जिल्हाउपध्यक्ष अमोल भाऊ दिघे , पाथरवाला गावाच्याआदर्श महिला बचत गट श्रीमती शांताबाई गुजर मा. चेअरमन शिवाजीराव पाटील खाटीक माननीय डेप्युटी सरपंच चंद्रभान पाटील खाटीक, एकनाथ विश्वनाथ खाटिक यांचे सह हजारो संख्येने इमारत कामगार उपस्थित होते


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

