नेवासा – नेवासा तालुक्यातील हिंदू धर्म रक्षक ऋषिकेश भाऊ शेटे यांनी शनिशिंगणापूर देवस्थान येथील मुस्लिम कर्मचारी हटाव आंदोलन व करोडो रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आणून, तालुक्यात हिंदुत्व बद्दल व गोरक्षणाच्या संदर्भात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री संत ज्ञानेश्वर सभागृह पुणे येथे समस्त हिंदू आघाडी आयोजित” राष्ट्र साधना”या भव्य दिव्य कार्यक्रमात प्रमुख अतिथी मान्यवर वीर संताजी घोरपडे जीवन चरित्र कादंबरीचे लेखक व महाराष्ट्र पोलीस नाशिक महानिरीक्षक(DIG ) मा.बी.जी.शेखर पाटील साहेब ,राष्ट्रीय गोरक्षक समितीचे मा.मिलिंदजी एकबोटे, वीर संताजी घोरपडे यांचे चौदावे वंशज माननीय श्री शामराजे घोरपडे यांच्या शुभहस्ते हिंदू धर्म रक्षक ऋषिकेश भाऊ शेटे यांना”हिंदुत्व शौर्य “पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि चांदीचे हातातील कडे, आणि छत्रपती संभाजी महाराजांची व वीर संताजी घोरपडे यांची छायाचित्र प्रतिकृती देण्यात आली. याप्रसंगी प्रदेश गोरक्ष समितीचे सदस्य मिलिंदजी एकबोटे यांनी पुरस्कारार्थी ऋषिकेश शेटे यांच्या कामाचा संघर्षमय प्रवास व हिंदुत्वाची प्रखर बाजू मांडून हिंदुत्वाचे उल्लेखनीय केलेल्या कामाची माहिती देऊन मान्यवरांना आपल्या भाषणातून प्रास्ताविक केले, त्यानंतर सत्कारमूर्ती ऋषिकेश शेटे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आपल्याला हिंदुत्वाचे काम करताना आलेल्या अडचणी व त्यावर उपाय योजना कशी केली पाहिजे या संदर्भात उपस्थित त्यांना संबोधित केले व हिंदुत्व शौर्य पुरस्कार दिल्याबद्दल मान्यवर आणि उपस्थित यांचे आभार मानले व यापुढेही प्रकार हिंदुत्वाचे काम करून आपल्या हिंदू देवदेवतांच्या मंदिरावर व जागेवर केलेले इतर धर्मीयअतिक्रमणे विषयी लवकरच मोठी कायदेशीर लढाई लढून अनेक देवस्थाने या पासून मुक्त करून हिंदू बांधवांना पूजा, आरतीसाठी खुले करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले.

याप्रसंगी हिंदुत्व ची बुलंद तोफ मिलिंद भाऊ इंगोले व पुणे शहर परिसरातील सकल हिंदू समाजाचे सदस्य संजय भोसले, राम पाटोळे, जगन्नाथ पाळवदे, बापू इंदापूरकर ,शुभम रेणुगुंठा ,अजय सिंग खत्री,अण्णा गलधर ,स्वामी गौड ,अजय शिंदे ,श्रवण पाठक ,रेवजी घुले ,सौरभ जाधव ,सुहास पासलकर ,महेश बलकवडे ,अमोल टोळी ,शामराव घोरपडे सह नेवासा तालुक्यातील हिंदू योद्धे नानासाहेब डौले, बापूसाहेब दारकुंडे, साकाहरी पवार , राजेंद्र पवार,संजय पवार ,अण्णासाहेब पवार,सचिन गवांदे, अंकुश भनगे, किशोर भांगे,आदिनाथ पटारे,महेश येळवंडे,आदिनाथ निकम, ज्ञानेश्वर पागिरे, सौरव गवळी, सुरज राजळे,कृष्णा मांडगे,सौरभ जंगले, सुधीर शेटे,मयूर वाघमारे,वेदांत पाठक ,अमोल गायकवाड आकाश लोखंडे नामदेव जाधव ,यांच्या सह नेवासा तालुक्यातील हिंदूधर्म रक्षक ऋषिकेश भाऊ शेटे पाटील यांचे असंख्य मित्र परिवार व हिंदु समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

