नेवासा : नुकताच शनिशिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करुन प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती केली. या निवडीचे मंगळवारी सकाळी भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून, जय शनिदेव, जय श्रीराम, हरहर महादेवाचा जयघोष करून आनंद व्यक्त केला. व विधीवत भगवान शनि देवाची अभिषेक घालून पूजा केली.
याप्रसंगी शनेश्वर देवस्थान भ्रष्टाचारा विषयी गेल्या दहा वर्षापासून अविरत व प्रामाणिकपणे लढा देणारे भाजपचे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांनी देवस्थान भ्रष्टाचारांच्या विळख्यातून मुक्त केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखर जी बावनकुळे, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, व तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे जाहीर आभार मानले, व उपस्थित शनि भक्तांना पेढे भरले.

त्या प्रसंगी देवस्थानचे माजी कार्यकारी अधिकारी डॉ. उदय कुमार बल्लाल ,भाजप ओबीसी आघाडीचे देविदास साळुंके, भाजप वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कोलते,नानासाहेब ढेरे, महेश येळवंडे, भाऊसाहेब चौरे, विलास भालके ,प्रकाश गायके, दत्ता शेटे भाजप आय टी सेल चे जिल्हाध्यक्षआदिनाथ पटारे, गोविंद कदम, प्रमोद घावटे, नानासाहेब डौले , सचिन काळे, सकाळी पवार अमोल जाधव ,नामदेव जाधव, दादा घायाळ, सुधीर झीने ,सचिन गवांदे, संदीप चव्हाण ज्ञानेश्वर पागिरे, महेश सोनवणे ,प्रदीप जाधव,सतीश गडाख, अमोल गायकवाड, शुभम वाघ,आदींच्या नेतृत्वात सकाळी उदासी महाराज मठात विधिवत पूजा व अभिषेक केल्यानंतर चौथऱ्यावर जावून तैलाभिषेक करण्यात आला.
शनिशिंगणापूरच्या शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाची बरखास्ती करून प्रशासक नियुक्तीही झाली. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांची तात्पुरती नेमणूक केली गेली. शनिशिंगणापूरच्या मागील ६० वर्षांच्या इतिहासातील हा पहिलाच निर्णय शासनाकडून घेण्यात आला. प्रशासक नियुक्तीनंतर देवस्थानच्या कामात पारदर्शकता येईल आणि विकासाला चालना मिळेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी बोलताना व्यक्त केले.

शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाची स्थापना १८ जुलै १९६३ मध्ये शिंगणापूर येथील स्व. बाबुराव बानकर यांनी केली. त्यानंतर विश्वस्त मंडळाचा कारभार सुरू झाला. बरखास्त केलेल्या विश्वस्त मंडळाचा कार्यकाळ येत्या डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार होता. त्यापूर्वीच विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले. देवस्थानातील ॲपचा आर्थिक घोटाळा व अनावश्यक नोकर भरती प्रकरण चांगलेच गाजल्यानंतर त्याचे पडसाद विधानसभेत उमटले आणि विश्वस्त मंडळावर कारवाईची टांगती तलवार आधीपासून होती. गेल्या ६० वर्षांच्या विश्वस्त मंडळ एकदही बरखास्त झाले नव्हते.

या निर्णयामुळे नेवासा तालुक्यातील सर्वच शनी भक्त आनंदीत होत असून, मी स्वतः जोपर्यंत भ्रष्टाचार लोक या शिंगणापूर देवस्थान मधून जात नाही तोपर्यंत मी शनि देवाचे दर्शन घेणार नाहीअसे प्रण मी केला होता तो आज मी सोडून श्री देवाचरणी नतमस्तक होत आहे की याप्रसंगी मी एकच म्हणेल” देवाकडे देर हे परंतु अंधेर नही “आणि देवाच्या काठीचा आवाज होत नसतो असे मनोगत शनि देवस्थानचे माजी कार्यकारी अधिकारी डॉक्टर उदयकुमार बल्लाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व उपस्थित त्यांना पेढे वाटून फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

