वाहन चालक मालक संघटनेचा आंदोलनाचा इशारा
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथील सहाय्यक उपप्रादेशिक अधिका-याचा मनमानी व भ्रष्ट कारभार त्वरीत बंद करण्यासाठी व खालील मागण्या त्वरीत मान्य करण्यासाठी वाहन चालक प्रतिनिधी संघटना सह वाहतुक आघाडी रिपाई आठवले गट व विविध संघटनेचे दिनांक 06 10 2025 रोजी बेमुदत धरणे आंदोलन.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथील अधिकाऱ्यांचा मनमानी व भ्रष्ट कारभार त्वरित बंद करण्यासाठी व खालील मागण्या त्वरित मान्य करण्यासाठी संदिप गाडेकर, सलीम शेख, जावेद शेख, विजय पाठक, शामराजे गवारे सह चालक मालक व प्रतिनिधीचा अंदोलनाचा इशारा.
१) उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथील सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या भ्रष्ट अधिका-यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी.

२) सदर कार्यालयातील सर्व वाहनांची ऑफलाईन रेकॉर्ड त्वरीत शंभर टक्के ऑनलाईन करण्यात यावे.
३) कार्यालयातून वाहन धारकांचे जमा केलेले कागदपत्र गहाळ होत असल्याने वाहनधारकास कागदपत्रे जमा केल्याची पोहोच देण्यात यावी.
४) वाहन हस्तांतरण करतांना सदर वाहन कार्यालयात तपासणीसाठी बोलावण्यात येवू नये.
५)कार्यालय क्षेत्राबाहेरील अनुज्ञप्ती चाचणी त्वरीत सुरु करण्यात यावी.
प्रत्येक महिन्याला सहा तालुक्यांमध्ये महिनाभरात प्रत्येक तालुक्यात किमान चार शिबीरे घेण्यात यावी.
शंभर शिकाऊ लायसेन्स व अनुज्ञप्ती चाचणीच्या दोनशे (२००) चाचण्या प्रत्येक शिबीरात घेण्यात याव्यात.
७) मा. न्यायाधिशांनी दोषमुक्त अथवा निर्दोष केलेल्या व्यक्तीला प्रवासी वाहतुकीचा वैद्य परवाना त्वरीत देण्यात यावा.
८) योग्यता प्रमाणपत्र प्रत वाहन तपासणी नंतर त्वरीत देण्यात यावी.
9) वाहनधारक चालक मालक यांनी फेसलेस अर्ज दिल्यास अडवणूक न करता सदर कामे त्वरीत करण्यात यावी.
१०) कर्मचारी रजेवर असल्यास त्यांच्याकडील कामकाज इतर कर्मचा-यांकडे सुपूर्द करण्यात यावे
११) सेवाहमी कायद्यानुसार कनिष्ठ-वरीष्ठ व मुख्य लिपीक यांच्याकडे कामकाज सोपविण्यात यावे.

१२) ५०% कर्मचारी व एक वरिष्ठ अधिकारी मुख्यालयाजवळ राहत नसल्याने त्यांची चौकशी होवून त्वरीत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
१३) बंद पडलेले लाखो रुपयांचे जनरेटरची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी.
१४) कार्यालयात कर्मचारी व अधिकारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेवर हजर राहण्यासाठी बायोमेट्रीक मशिन बसविण्यात यावे.
१५) महिला भगीनींसाठी स्वच्छतागृहाची तळमजल्यावर व्यवस्था त्वरीत करण्यात यावी.
१६) अनेक महिन्यांपासून एकाच कामकाजाच्या टेवल खुर्चीला चिटकून बसलेल्या कर्मचा-यांचे त्वरीत पदभार बदलण्यात यावे.
१७) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तालुक्यात ऑनलाईन मेडिकल फिटनेस करण्यासाठी एम.बी.बी.एस. डॉक्टर्स इच्छुक नसल्याने ऑफलाईन मेडीकल फीटनेस सर्टीफिकेट अपलोड करण्याची मुभा मिळावी.
१८) प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्या निर्णयानुसार कालबाह्य झालेल्या तीनचाकी वाहनांवर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी.
१९) कार्यालयामध्ये हालचाल अथवा फिरस्ती रजिस्टरमध्ये दररोज नोंदी करण्यात याव्या व ते जनतेसाठी उपलब्ध करण्यात यावे.
२०) वरीष्ठ अधिका-यांपैकी एक अधिकारी हजर नसल्यास दुस-या अधिका-याने परीवहन तसेच परिवहनत्तर व अनुज्ञप्तीचे सर्व कामे करावेत.

२१) वैगवेगळ्या कागदपत्रांच्या कामासाठी वेगवेगळे पटअप फॉर्म बंद करून एकच पुटअप फॉर्मची निर्मिती करावी सर्व पुटअप फॉर्म लिपीकाने भरणे अपेक्षित असल्याने त्याची पुर्तता लिपीकाने करावी.
२२) कार्यालयात येणा-या वाहन मालक चालक यांना कामकाज होईपर्यंत थांबण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात यावी व सुरक्षा कर्मचा-याची त्वरीत नियुक्ती करण्यात यावी.
२३) वाहन चालक मालक यांना वरीष्ठ अधिका-यांना भेटण्याची वेळ ही कामकाजाच्या वेळेनुसार दिवसभर असावी
२४) कार्यालयातील दोनही मुख्य लिपीकांना परीवहन व परिवहनत्तेर कामकाज करण्याची मुभा असावी.
२५) गहाळ झालेली कागदपत्रे कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे त्वरीत मार्गी लावण्यात यावी.
२६) त्वरीत कामकाज करण्यासाठी तसेच कामांची अडवणूक करून वरकमाई (भ्रष्टाचार) केलेल्या रकमेची पोहोच पावती देण्यात यावी व भ्रष्टाचार करणे कायद्याने अधिकृत करण्यात यावे. तसेच भ्रष्टाचाराची रक्कम गोळा करण्यासाठी ठेवलेले अनाधिकृत व्यक्तींना निर्बंध घालण्यात यावे.
वरील सर्व मागण्यांचा जाणीवपूर्वक विचार होऊन तसेच परिस्थितीचा विचार होऊन भ्रष्टाचार मुक्त भारत या संकल्पनेतून सदर निवेदनाचा विचार होऊन तत्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा नाईलाजास्तव इच्छा नसतानाही लोकशाही मार्गाने वाहन चालक-मालक व महाराष्ट्र राज्य चालक-मालक प्रतिनिधी संघटना, वाहतूक आघाडी रिपीई 06-10-2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय अहिल्यानगर, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे दररोज धरणे आंदोलन करतील याची नोंद घ्यावी होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी ही सर्वस्वी प्रशासनावर असेल याची नोंद घ्यावी.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर सर्व सात तालुक्याचे प्रतिनिधी व चालक मालक संघटनेचे पदाधिकारी वाहन चालक मालक याच्या सह्या आहेत.

संदीप गाडेकर
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष महाराष्ट्र राज्य चालक-मालक प्रतिनिधी संघटना जिल्हा उपाध्यक्ष ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटना संस्थापक अध्यक्ष नेवासा फाटा प्रेस क्लब
सलीम शेख
जिल्हाध्यक्ष वाहतूक आघाडी आरबीआय आठवले गट
विजय पाठक
भाजपा ओबीसी युवा मोर्चा सोशल मीडिया सेल श्रीरामपूर
श्याम राजे गवारे पाटील
सदस्य राष्ट्रीय श्रीराम संघ शिरसगाव
जावेद शेख
जरिया फाउंडेशन
सामाजिक कार्यकर्ते

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

