जगभरातील माहिती अधिकारातील तज्ञ, कार्यकर्ते,संस्था,संघटना यांनी बल्गेरिया मध्ये 28 सप्टेंबर 2002 रोजी फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन नेटवर्क या कृतिशील संगठनाच्या माध्यमातून माहिती अधिकाराबाबत विशेष जागृती राष्ट्रीय स्तरावर करण्याचा निर्णय घेतला. म्हणून 28 सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन जगभरात साजरा केला जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते श्री.कारभारी गरड यांनी माहिती अधिकार दिन प्रसंगी आयोजित व्याख्यानात सांगितले.

नेवासा तालुक्यातील जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालय – भेंडा व हनुमान माध्यमिक विद्यालय – गोंडेगाव येथे माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात सामाजिक कार्यकर्ते कारभारी गरड बोलत होते. व्यासपीठावर प्रा. सुधाकर नवथर, प्रा.संतोष सोनवणे,प्रा. नानासाहेब खराडे , प्रा.गणपत घनवट, प्रा.गोरक्षनाथ पाठक तसेच गोंडेगाव येथील हनुमान माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक श्री संदीप फुलारी, अध्यापक श्री भानुदास वाघ,श्री देवेंद्र वाघुले , श्री गोरक्षनाथ नवले , श्री सागर बनसोडे ,श्रीमती वर्षा भोसले , श्रीमती सुवर्णा माळी , श्री कैलास वाघुले, श्री कैलास पाठक सह विध्यार्थी उपस्थित होते.
माहिती अधिकाराचा उगम राजस्थान येथील मजदूर कसान पार्टीच्या सामाजिक लेखा परीक्षण संकल्पनेतून व अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झाला.

माहिती स्वातंत्र्याचा कायदा,( महाराष्ट्र माहितीचा अधिकार 2002 ) , माहितीचा अधिकार 2005 , माहितीची व्याख्या, माहितीचे प्रकार, माहिती अधिकाराचा उद्देश , विविध कार्यालयातून माहिती मिळवण्यासाठीचे अर्ज व माहिती मिळविण्याची पद्धती, नागरिकांची सनद , माहिती अधिकारातील तरतुदी, माहिती मागताना तसेच प्रथम व द्वितीय अपील करताना घ्यावयाची काळजी, त्यासाठी आवश्यक असणारी फी, माहिती न मागता माहिती बघण्याचा अधिकार व पद्धती आदी बाबत सविस्तर सांगून माहितीगार नागरिकांचे समूह तयार करून अंकुश ठेवण्याचे आवाहन व्याख्यानातून याप्रसंगी गरड यांनी केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.