लंघे

नेवासा – नेवासा तालुक्यातील घोगरगाव, जैनपूर व गोदाकाठच्या परिसरात गोदावरी नदीच्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून, घर, दुकाने, शेतीत सर्वत्र पाणीच पाणी आहे. गुरेढोरे, चारा, सोयाबीन, कापूस, ऊस, फळबागा आणि शेतातील माती वाहून गेली आहे. या संकटग्रस्त परिस्थितीत आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी सोमवारी (दि. २९) सकाळी १० वाजता त्यांनी पूरग्रस्तांच्या गाठीभेटी घेतल्या, नुकसानीची पाहणी केली.

लंघे

त्यांनी तहसीलदार डॉ. संजय बिरादार, गटविकास अधिकारी संजय लखवाल आणि कृषी अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. पूरग्रस्तांसाठी जेवण, निवारा आणि इतर सोयी तातडीने उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. गंगा, गोदावरी आणि प्रवरा नदीकाठच्या गावांची त्यांनी दिवसभर पाहणी केली. कार्यकर्त्यांसह त्यांनी नागरिकांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.

लंघे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लंघे
लंघे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लंघे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!