नेवासा: नवरात्रोत्सवानिमित्त श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने ‘सन्मान नवदुर्गांचा’ या अभिनव उपक्रमांतर्गत महिलांसाठी विशेष बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचा उद्देश महिलांमध्ये वाहतूक नियमांचे पालन, दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर आणि चारचाकी चालवताना सीट बेल्टचा वापर याबाबत जनजागृती करणे हा होता.
रॅलीला नेवासा येथील जिल्हा प्राथमिक शाळेतून उत्साहात प्रारंभ झाला. महिलांनी परिसरातील विविध मार्गांवरून हेल्मेट रॅली काढत सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व प्रभावीपणे पटवून दिले. रॅलीची सांगता त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या राजमाता सभागृहात ढोल-ताशा आणि लेझीम पथकाच्या वादनात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा स्नेहलताई घाडगेपाटील होत्या. यावेळी शिक्षणमहर्षी साहेबराव घाडगेपाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या उपक्रमात जिल्हा परिषद गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका, स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अमृता श्रीकांत नळकांडे, ॲड. सोनल वाखुरे, नगरसेविका डॉ. निर्मला सांगळे, डॉ. अनुराधा गोरे यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, १०० हून अधिक महिलांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे, वाहन निरीक्षक प्रितेश भावसार, सचिन पाटील, किरण लचुरे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल सरकाटे, सचिन सानप, कुणाल वाघ तसेच महाराष्ट्र राज्य चालक-मालक प्रतिनिधी संघटना उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप गाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

मोटार प्रशिक्षण केंद्रांच्या संचालकांनीही उपक्रमात मोलाचे योगदान दिले. शितल तळपे, लीना परदेशी, निकिता खंडीझोड यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. राहुल बोरुडे यांनी तर आभार प्रदर्शन शितल तळपे यांनी केले.
याप्रसंगी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक विनायक घनवट, संतोष झिंजूर्डे, सुनील निंबाळकर, संदेश मुंगसे तसेच त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे राजेंद्र कात्रस, प्रवीण पंडित, नामदेव ताके, प्रा. मंगेश वैरागर, प्रा. प्रवीण आवारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.