ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
महाराज

सोनईरत्न पुरस्काराचे उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर,माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत वितरण.

सोनई, ता. नेवासा – यशवंत सामाजिक प्रतिष्ठान, सोनई यांच्या वतीने दरवर्षी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जाणारा “सोनईरत्न पुरस्कार 2025” यंदा विजयादशमीच्या पूर्वसंध्येला मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या वर्षीचा सोनईरत्न पुरस्कार “मानवसेवा हीच ईश्वरसेवा” या तत्त्वावर विशेषतः बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी निस्वार्थ सेवा करणारे डॉ. ओमप्रकाश अट्टल यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या सेवाभावी कार्याला हा पुरस्कार एक प्रकारची सामाजिक सलाम ठरला.

तसेच सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे स्व. भाऊसाहेब लालजी दरंदले, स्व. मोहनराव हनुमंता येळवंडे आणि स्व. गोरक्षनाथ केरू जगताप यांना “मरणोत्तर सोनईरत्न पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी हा सन्मान स्वीकारला आणि उपस्थितांचे अंत:करण द्रवून गेले.

या पुरस्कारांचे वितरण ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर, माजी मंत्री शंकरराव गडाख, विश्वासराव गडाख ,उदयन गडाख यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या सोहळ्यात “सोनई महोत्सव” अंतर्गत झालेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांनाही पारितोषिके देण्यात आली.

महाराज

उदयन गडाख, उपाध्यक्ष, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान प्रस्ताविक करताना म्हणाले, “सोनई परिसरासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची तरुण पिढीला ओळख व्हावी, त्यांच्या सेवेला समाजाने कृतज्ञतेने आठवावे, यासाठी हा सन्मान दिला जातो.”

माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “सोनईरत्न पुरस्कार हा केवळ गौरव नव्हे, तर सेवाभावाला दिलेला सलाम आहे. यावर्षीपासून मरणोत्तर पुरस्काराची सुरूवात झाल्याने अनेक थोर व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणे शक्य होणार आहे.” त्यांनी पुरस्कारार्थी व महोत्सवात सहभागी सर्वांचा मनःपूर्वक गौरव केला.

ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी आपल्या भावनिक भाषणात म्हटले, “जुन्या पिढीचा सन्मान करणारा हा पुरस्कार तरुणांना प्रेरणा देतो. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला दिला जाणारा हा पुरस्कार अधिक मंगल आणि महत्वाचा ठरतो.” त्यांनी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

महाराज

कार्यक्रमाला गावातील महिला भगिनी, युवक, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सोनई महोत्सवामुळे संपूर्ण गावात यात्रेचे स्वरूप निर्माण झाले असून, हा उपक्रम गावाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत मोलाचा वाटा उचलतो.
हा पुरस्कार आणि सोहळा केवळ गौरवापुरता मर्यादित न राहता, सोनईच्या सामाजिक जडणघडणीचा एक प्रेरणादायी आणि अभिमानास्पद अध्याय ठरला.
याप्रसंगी डॉ ओमप्रकाश अट्टल,धनंजय दरंदले,बाळासाहेब सोनवणे,अमित जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.

पुरस्कारप्राप्त: डॉ. ओमप्रकाशजी अट्टल

मरणोत्तर पुरस्कार…2
स्व. भाऊसाहेब दरंदले, स्व. मोहनराव येळवंडे, स्व. गोरक्षनाथ जगताप

महाराज
महाराज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाराज
महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाराज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *