भारत देशाचे कणखर_लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी यांच्या ७५ व्या अमृत महोत्सव वाढदिवसा निमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत- ‘नमो नेत्र संजीवनी अभियान’_ मोफत नेत्र तपासणी उपचार व शस्त्रक्रिया शिबिर आज बुधवार दि ०१ ऑक्टोबर, २०२५ रोजी शिरसगाव, ता.नेवासा येथे लोकप्रिय आमदार विठ्ठल भाऊ लंघे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
मोफत नेत्र तपासणी उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन जनसेवक लोकप्रिय आमदार विठ्ठल भाऊ लंघे यांच्या शुभहस्ते फित कापून आणि श्री महालक्ष्मी माता पूजन व दीपप्रज्वलनाने झाले.
यावेळी एकूण रुग्ण २१३हे नोंदवले गेले तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी ३९रुग्णांची नोंदणी करण्यात आली तसेच ६८ मोफत चष्मे वाटप यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी रत्नामाला लंघे, दत्तात्रेय पोटे, नवनाथ साळुंके, भाजपा आयुष्मान भारत मिशन जिल्हाध्यक्ष सचिन काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ डिंबर, वैद्यकीय अधिकारी डॉ हर्षदा देवरे, डॉ कानडे, आनंदऋषी नेत्रालय वैद्यकीय स्टाफ, तसेच महायुती मधील पदाधिकारी_कार्यकर्ते व पंचक्रोशीतील बहुसंख्य ग्रामस्थ, महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानात डिजिटल मशीन द्वारे मोफत डोळे तपासणी, उपचार व चष्मे वाटप करण्यात आले. तसेच, मोतीबिंदू नेत्र रुग्णांची शस्त्रक्रिया लवकरच विखे पाटील हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे मोफत करण्यात येणार आहे. बहुसंख्य रुग्णांना या शिबिरामुळे मोफत डोळे उपचार संबंधी लाभ झाला असल्याने आमदार विठ्ठलराव लंघे यांचे उपस्थित रुग्णांनी व नागरिकांनी आमदार लंघे यांचे मनःपूर्वक आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.