अनुलोम संस्थेअंतर्गत विविध समाज हितकारी उपक्रम २०१६ पासून पूर्ण महाराष्ट्रात राबवले जात असून संविधानाची 75 वी या उपक्रमानिमित्त विविध शाळांमध्ये विविध स्वयंसेवक संविधानाची जागृती करण्याचे काम करत असून, देशाचे भविष्याला संविधान समजणे गरजेचे असून, संविधान निर्माण करणाऱ्या महापुरुषांनी पूर्ण भारताचा विचार करून जगातील सर्वोत्कृष्ट लिखित संविधान निर्माण केले आहे. तसेच संविधान अभ्यासक्रमात थोडक्यात असते त्याची माहिती मुलांना व्हिडिओ तसेच पिपिटि मार्फत समजवली जात आहे. जवाहर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, चांदा येथे विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल तोंड ओळख करून देण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून अँड मयूर वाखुरे यांनी मार्गदर्शन केले. त्यांना विशेष नियोजन सहकार्य अनुलोम संस्थेचे सेवक अविनाश गायकवाड यांनी केले तर जवाहर विद्यालयाच्या शालेय प्रशासनाचे पूर्ण सहकार्य मिळाले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

