नेवासा (ता.नेवासा) │ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तब्बल तीन वर्षांपासून प्रलंबित होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर निवडणूक आयोगाने या निवडणुका तातडीने घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार आज नेवासा नगरपंचायतीच्या वॉर्डनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली.
दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी नेवासा तहसील कार्यालयात ही सोडत पार पडली. काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण जागेची सोडत जाहीर झाली होती, आणि आज वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

या सोडतीमध्ये वॉर्डनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित झाले आहे –
वार्ड क्रमांक १ – नागरीकांचा मागास प्रवर्ग (OBC) महिला
वार्ड क्रमांक २ – अनुसूचित जाती (SC) महिला
वार्ड क्रमांक ३ – नागरीकांचा मागास प्रवर्ग (OBC)
वार्ड क्रमांक ४ – सर्वसाधारण
वार्ड क्रमांक ५ – सर्वसाधारण
वार्ड क्रमांक ६ – नागरीकांचा मागास प्रवर्ग (OBC)
वार्ड क्रमांक ७ – सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक ८ – सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक ९ – सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक १० – सर्वसाधारण
वार्ड क्रमांक ११ – सर्वसाधारण
वार्ड क्रमांक १२ – सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक १३ – नागरीकांचा मागास प्रवर्ग (OBC) महिला
वार्ड क्रमांक १४ – नागरीकांचा मागास प्रवर्ग (OBC) महिला
वार्ड क्रमांक १५ – सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक १६ – अनुसूचित जाती (SC) पुरुष
वार्ड क्रमांक १७ – अनुसूचित जमाती (ST)

सोडत जाहीर होताच नगरपंचायत निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, विविध पक्ष व इच्छुक उमेदवारांकडून निवडणूक तयारीला सुरुवात झाली आहे. सोशल मीडिया, प्रचार योजनेपासून ते मतदारांशी संवाद साधण्यापर्यंतची चढाओढ आता नेवासात रंगताना दिसत आहे.
राजकीय पातळीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आता प्रत्यक्ष रणांगणात उतरणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नेवासा नगरपंचायतीचा राजकीय पट अधिक रंगतदार होणार हे निश्चित आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

