नेवासा- लोकनेते स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी वातावरणात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक चेअरमन नंदकुमार पाटील होते.
नंदकुमार पाटील म्हणाले, पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जपत कामकाज केले असून २० लाख २१ हजारांचा नफा झाला आहे. त्यामुळे सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यात येणार आहे. २१ वर्षे पूर्ण झालेल्या पतसंस्थेच्या ठेवी ५५ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. ३७ कोटी २० लाखांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. संस्थेची २२ कोटींची गुंतवणूक असून उद्योजक व व्यावसायिक सभासदांना वेळोवेळी मदत करण्यास पतसंस्था कटिबद्ध आहे. मात्र, घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

वार्षिक अहवाल व्यवस्थापक लक्ष्मण नाबदे यांनी सादर केला. सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. या प्रसंगी संचालक विजयकुमार गांधी, काकासाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ज्येष्ठ सभासद आर. बी. गायकवाड, उपाध्यक्ष महंमदभाई शेख, नगरपंचायत माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, सोसायटी माजी चेअरमन दिलीपराव जामदार, संचालक प्रा. कडूबाळ देशमुख, शेख आदी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.