ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
पेन्शन

नेवासा तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पेन्शन वाढीमध्ये सहभाग असून ही पेन्शन वाढवावी यासाठी आज नेवासात तहसील कार्यालय येथे सेवानेवृत्त कर्मचारी एकत्रित तहसीलदारांना निवेदन दिले ‌.

या निवेदनाद्वारे भारत सरकारला त्यांनी मागणी केली आहे की प्रति महिना ७५०० पेन्शन व डीए मिळणेबाबत निवेदनाद्वारे विनंती केली आहे तसेच नेवासा तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन केले.

यावेळी निवेदनात म्हटले की तुटपुंजी पेन्शन वरती आमचा कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच वयरुद्ध पेन्शन धारकांचा दवाखान्याचा तसेच कुटुंबीय अर्थव्यवस्था बिघडत चालली असून भारत सरकारने तसेच देशाचे पंतप्रधान मा‌.प्रधानमंत्री मोदीजींनी यामध्ये लवकरात लवकर पेन्शन वाढीसाठी लक्ष घालून आम्हाला पेन्शन वाढून मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे सहकार क्षेत्रातील , सहकारी साखर कारखाना कर्मचारी , सहकार बँक कर्मचारी, सहकारी सोसायटी कर्मचारी, एस टी महामंडळ व वीज महामंडळ कर्मचाऱ्यांनी या वेळी पेन्शन वाढीची मागणी केली आहे.

पेन्शन

यावेळी राष्ट्रीय संघर्ष समितीचे पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर, कहाने साहेब, राजपूत साहेब, सुरेश कटारिया, अहिल्यानगरचे चिंतामणी साहेब, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे निवेदन नेवासा तहसील कार्यालय येथे श्री नायब तहसीलदार गोसावी साहेब यांनी स्वीकारले.

तसेच यावेळी नायब तहसीलदार गोसावी साहेब बोलताना म्हणाले की आम्ही आपल्या मागण्या सरकारपर्यंत तसेच केंद्र सरकारपर्यंत पोहोचण्याची आपल्याला आश्वासन देत आहे.

यावेळी पेन्शन संघटनेचे राष्ट्रीय संघर्ष समितीचे पश्चिम भारत संघटक पोखरकर साहेब बोलताना म्हणाले सध्याच्या या तुटपुंजी पेन्शन मध्ये आमचा उदरनिर्वाह भाघत नसून वयामानानुसार रुग्णालयाच्या खर्च , तसेच कौटुंबिक खर्च तसेच वाढती महागाई यामध्ये स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आम्हाला कठीण जात आहे सर्वसामान्य जीवन जगत असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.

पेन्शन

यावेळी सदस्य आप्पासाहेब वाबळे व सदस्य बाळासाहेब निकम बोलताना म्हणाले की आम्ही भारत सरकारला विनंती करतो की आम्हाला कमीत कमी ७५०० या पेक्षा अधिक पेन्शन मिळावी व आम्हाला योग्य तो न्याय सरकारने द्यावा असे बोलताना म्हणाले.

यावेळी शनैश्वर देवस्थानचे माजी कार्यकारी अधिकारी यु.एम बल्लाळ, उपाध्यक्ष विनायक लोळगे,अध्यक्ष बापूराव बहिरट,तालुका पेन्शनधारक सदस्य भानुदास कावरे ,बाळासाहेब निकम, गोरक्षनाथ कापसे, चंद्रकांत सोनवणे, थोरे भाऊसाहेब, विजयराव कावरे, अशोक पोतदार, शिवाजी मते, आप्पासाहेब वाबळे, सोपानराव चौधरी किसनराव निकम एन.के.भणगे,संभाजी वेव्हारे अदी पेन्शनधारक सदस्य नेवासा तहसील कार्यालया समोर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पेन्शन
पेन्शन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पेन्शन
पेन्शन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पेन्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *