सोनई – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या प्रेरणेने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी भारतीय संविधान अमृत महोत्सवानिमित्त संविधान जागृती उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत प्रभातफेरी, पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धा आणि संविधान जागृती व्याख्यान यांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात संविधान जागृती प्रभातफेरी व प्रभावी पथनाट्य सादरीकरणाने करण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य अशोक सावंत उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व सांगत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते म्हणून संगमनेर येथील ओमकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रतिक शिंदे यांनी भारतीय संविधानाची निर्मिती, ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याचे महत्त्व तसेच संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्ये यावर सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य मा. संजय कीर्तने यांचीही उपस्थिती लाभली. त्यांनी महाविद्यालयाने घेतलेल्या उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सहभागाचे विशेष अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ काल्हापुरे होते. प्रास्ताविक रासेयो प्रमुख डॉ. बाळासाहेब खेडकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. राहुल निपुंगे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. रविना शेडगे यांनी केले, तर आभारप्रदर्शन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अविनाश साळवे यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने तर समारोप रासेयो गीताने करण्यात आला. महाविद्यालयासह माका महाविद्यालय, जिजामाता महाविद्यालय भेंडा, औषधनिर्माण महाविद्यालय सोनई येथील रासेयो कार्यक्रम अधिकारी व एकूण १८० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या वेळी रांगोळी, भित्तीपत्रक स्पर्धांचे परीक्षण डॉ. श्वेता चौधारे, डॉ. तुकाराम जाधव व प्रा. कोकरे सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शरद औटी, डॉ. विशाल फाटके, प्रा. कावेरी ढोकणे, डॉ. शौकत फकीर, डॉ. सोपान नजन, प्रा. अनिकेत जाधव, प्रा. विलास राठोड, प्रा. निवृत्ती सोनवणे, प्रा. मनीषा कदम, प्रा. प्रतीक्षा कंक, प्रा. श्रुती वने, प्रा. विशाल पवार, प्रा. विवेक वने, प्रा. हर्षदा तगरे, प्रा. हर्षदा काळे व इतर सहकारी प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

