नेवासा – महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सामाजिक जबाबदारी म्हणून नेवासा येथील श्री मोहिनीराज देवस्थान
ट्रस्ट ए-४१८ च्या वतीने एक लाखाची मदत धनादेशाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाखाचा धनादेश तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात जे संकट आले ते फार मोठे असून सामाजिक जबाबदारी म्हणून श्री मोहिनीराज देवस्थान ट्रस्ट ए-४१८ च्या वतीने एक लाखाचा धनादेश हा देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र उर्फ भारत प्रभाकर बडवे व जेष्ठ विश्वस्त भालचंद्र बडवे यांच्या सूचनेनुसार सर्व विश्वस्त मंडळाच्या सहमतीने देण्यात आला आहे.

सदरचा धनादेश तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांच्याकडे सुपूर्त करतेवेळी तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे,नेवासा पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार,पुरवठा अधिकारी सुदर्शन दुर्योधन,श्री मोहिनीराज देवस्थान स्ट्रस्ट ए – ४१८ व्हे सचिव जयेश बडवे, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक व देवस्थानचे उपाध्यक्ष शंकरराव बडवे,विश्वस्त अनंत बडवे उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

