पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील जुने पुनतगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार नंदराज दगडू शिंदे यांच्या येथे दि ८ ऑक्टोबर वार बुधवार रोजी भरदिवसा घराचे दरवाजे तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्यासह रोख रक्कम असा एकूण तीन लाख आठ्याशी हजार ऐवज चोरून नेला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा सुमा अगर त्या दरम्यान मी तसेच माझे कुटूंबातील वरिल सर्व असे आम्ही वाकचौरे मळा पुंजामाई या देवीची प्राणप्रतिष्ठा असल्याने त्या ठिकाणी धार्मीक कार्यक्रमासाठी घराचा पुढील दरवाजा बंद करून दरवाजास कुलूप लावून निघुन गेलो होतो. तसेच त्याच दिवशी दुपारी २ वा. सुमा, माझी सुन रुपाली, पत्नी- हिराबाई, मुलगा -अविनाश असे घराकडे गेले, तेव्हा त्यांनी मला फोन करुन सांगीतले की, आम्ही घराचा पुढील बंद दरवाजा उघडुन घरात गेलो तेव्हा आमचे लक्षात आले की, घर बंद करतांना घराचा मागील दरवाजा उघडा राहिला होता.

आम्ही घरात जावुन पाहिले असता घरातील लोखंडी पेटी व लोखंडी कपाटाची उचकापाचक झालेली असून कपाटातील कपडे घरात इतरत्र पडले असुन घरातील लोखंडी पेटीचे कुलूप तुटलेले असुन पेटीतुन सोने दागीन व रोख रक्कम अशी चोरीस गेली आहे,असे कळविल्याने मी घरी जावुन पाहिले असता घरातील लोखंडी पेटीतील खालील सोन्याच दागीने चोरीस गेले असल्याची माझी खात्री झाली असुन चोरीस गेले दागीने व रोख रक्कम खालील प्रमाणे. ६०००० रु किंमतीचे मिनी गंठन १५ ग्रॅम वजनाचे जु. वा. किं अंदाजे, ४०००० रु किमतीचे सोन्याचे गंठन १० ग्रॅम वजनाचे जु वा कि अंदाजे, २०००० रु किंमतीचे कानातील सोन्याचे वेल ५ ग्रॅम वजनाचे जु वा किं अंदाजे,
१६००० रु किंमतीचे डोरर्ले सोन्याच्या, पळया व सोन्याचे मनी असलेले ४ ग्रॅम वजनाचे जु वा किं अंदाजे,५२००० रु किंमतीचे सोन्याचे मिनी गंठन १३ ग्रॅम वजनाचे जु. वा. कि अंदाजे,४००० रु किंमतीच्या सोन्याच्या रिंगा १ ग्रॅम वजनाच्या जु वा कि अंदाजे, २४००० रु किंमतीची सोन्याच्या पळया असलेली व सोन्याचे मनी असलेली धाग्यात गुंफलेली अशी ६ ग्रॅम वजनाची पोथ जु वा कि अंदाजे,४०००० रु किमतीचे सोन्याचे झुबे १० ग्रॅम वजनाचे जु वा कि अंदाजे,२०००० रु किमतीचे सोन्याचे वेल ५ ग्रॅम वजनाचे जु वा कि अंदाजे, २८०००रु किंमतीची सोन्याच्या पळया व सोन्याचे मनी असलेली ७ ग्रॅम वजनाची पोथ जु वा कि अंदाजे,२४०००रु किंमतीची सोन्याच्या पळया व सोन्याचे मनी असे ६ ग्रॅम वजनाचे सोने व ६०००० रु रोख रक्कम त्यामध्ये ५००,१०० या दराच्या नोटा असा एकूण जवळपास ३लाख ८८००० रु एकुण ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

तरी कोणीतरी अज्ञात चोरटयाने दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा ते दिनांक ८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वा दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने माझे पुनतगाव शिवारातील शेत गट नंबर २०/२ मधिल शेत वस्ती मधिल घराचे पाठीमागील उघड्या असलेल्या घराच्या दरवाज्यातुन घरात प्रवेश करुन घरातील लोखंडी पेटीचे कोंडा कुलूप तोडुन तसेच लोखंडी कपाटातुन सोन्याचे दागीने व रोख रक्कम अशी कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे संमती शिवाय लबाडीचे इरादयाने स्वत हा चे फायदया करिता चोरुन नेली आहे. म्हणून माझी अज्ञात चोरट्या विरुध्द तक्रार आहे,त्यात अज्ञात चोरट्यांवर भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३,३०३ (२) या कलमानुसार नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल पवार,बिट हवालदार आप्पासाहेब वैद्य हे पुढील तपास करीत आहे.
पुनतगाव परिसरात ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर भरदिवसा चोरीचा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात या गावात पाहिल्यादाच दिवसा चोरीमुळे चोर देखील माहितीचे व परिसरातील असावेत असा अंदाज ग्रामस्थ बांधत आहे.

सदर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर पिंजून काढला असता चोरांचा काही सुगावा सापडला नाही.
मागील १० ते १२ दिवसांपूर्वी नंदराज शिंदे यांनी आपले सोने तालुक्यातील दोन पतसंस्थेतुन सोडून आणले होते.तसेच घरातील वेचून आणलेला साडे सहा क्विंटल कापूस दोन दिवसांपूर्वीच मार्केट मध्ये विकला होता.त्यामुळे सोन सोडून आणणे,कापूस विकणे व घरात कोणी नाही.या सर्व गोष्टी परिसरातील चोरांवर संशय घेण्यास भाग पाडत असल्याचे ग्रामस्थांनी व्यक्त केले.त्यात कोणत्या गोष्टी कुठे ठेवल्या हे माहिती असल्यामुळे इतर गोष्टीला हात लावला नाही.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

