सोनई – मुळा एज्युकेशन सोसायटीच्या यश अकॅडमी, सोनई येथील विद्यार्थी कु. अभिषेक भगवान बनकर याची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), खडकवासला, पुणे येथे अधिकारी पदासाठी निवड झाली असून ही अत्यंत गौरवाची आणि अभिमानास्पद बाब आहे.
अभिषेकने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण यश अकॅडमी, सोनई येथेच पूर्ण केले. तो शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या बॅचचा विद्यार्थी असून केवळ अभ्यासातच नव्हे तर क्रीडा आणि इतर सहशालेय उपक्रमांमध्येही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
शालेय जीवनात अभिषेक यश अकॅडमीच्या हॉकी संघाचा महत्त्वाचा खेळाडू होता. त्याने सीबीएससीच्या दक्षिण झोनल स्पर्धा तसेच विविध शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेचे यशस्वी प्रतिनिधित्व केले. याशिवाय, शालेय विद्यार्थी प्रतिनिधी म्हणूनही त्याने आपली जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली.

भारतीय सैन्यात अधिकारी बनणे हे त्याचे लहानपणापासूनचे स्वप्न होते आणि प्रचंड मेहनत, चिकाटी, पालक व शिक्षकांचा पाठिंबा याच्या जोरावर त्याने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे.
अभिषेकचे वडील शेतकरी असून आई गृहिणी आहेत. अशा पार्श्वभूमीवरून येऊन अभिषेकने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल मुळा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक खा. यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष उदयन गडाख, डॉ. निवेदिता गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, प्राचार्य शैलेश दरेकर, समन्वयक असीफ शेख, तसेच सर्व शिक्षक–शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी अभिषेकचे हार्दिक अभिनंदन केले असून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिषेकच्या यशामुळे मुळा एज्युकेशन सोसायटीचा झेंडा पुन्हा एकदा अभिमानाने उंचावला गेला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

