नेवासा – नेवासा येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल नेवासा या विद्यालयात प्राचार्य रावसाहेब चौधरी व पर्यवेक्षिका सुनिता दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक ९ऑक्टोबर २०२५ रोजी पर्यावरण पूरक आकाशकंदील बनवा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कार्डशीटच्या माध्यमातून विविध आकाराचे आकाशकंदील तयार करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. या स्पर्धेसाठी ‘ज्ञानोदय’चे कलाध्यापक प्रकाश पटेकर व कपिल चिंतामणी यांनी परिश्रम घेतले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.