नेवासा तालुक्यात पुर परिस्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत असताना शेतकरी व्यापाऱ्यांच्या कडुन लुटला जात असुन अशा व्यापाऱ्याचे परवाने रद्द करावेत असे निवेदन मार्केट कमिटी सचिव देवदत्त पालवे यांना नेवासा तालुका सरपंच संघटनेच्या वतीने दिल्याचे अध्यक्ष सरपंच शरद आरगडे यांनी दिल्याचे सांगितले
सध्या नेवासा तालुक्यातील तुर, सोयाबीन, मका,कापुस शेतकरी पुर परिस्थितीने खुपच आर्थिक अडचणीत सापडलेला आहे अशा वेळी तुर, सोयाबीन, मका,कापुस उत्पादन अत्यंत अल्प स्वरूपात निघत आहे

सदर शेतमाल अडचणीत असलेला शेतकरी दिपावली आल्याने व्यापाऱ्यांना विक्री साठी देत आहे तेव्हा विक्री अगोदर थोडासा शेतमाल त्याची कॉलिटी पाहण्यासाठी नेला जातो त्यावेळेला व्यापारी त्याचा जास्त भाव सांगतात आणि व्यापारी जेव्हा ट्रॅक्टर, छोटाहत्ती अशा गाड्या भाडोत्री लावून त्या भरून घेऊन जातो त्यावेळेला मात्र व्यापारी जाणीवपूर्वक कमी भावाने घेणार असे सांगतो कारण त्याला माहिती असते गाडी भाडे शेतमाल भरण्यासाठी घेतलेली मेहनत या गोष्टीमुळे शेतकरी आणलेला माल पाठीमागे नेणार नाही आणि होते ही तसेच शेतकरी नाविलाजने तिथं जायच्या अगोदर ठरलेल्या भावापेक्षा शंभर दोनशे रुपये कमी भाव घेऊन शेतमाल देतो
अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात सर्वात कमी भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केला जातो दिला जातो ही बाब अतिशय खेदजनक आहे याबाबत मार्केट कमिटीने विशेष लक्ष देणे गरजेचं आहे

तसेच क्विंटल मागे एक किलो कटता घेऊ नये असे मागील वर्षी लेखी मार्केट कमिटीने नोटीसद्वारे सांगितलेले असतानाही एक किलो कमी वजन धरले जाते असे करूनही कधीकधी शेतकऱ्याला विकलेल्या शेतीमालाच्या पैशाला उधार ठेवले जाते पैसे महिना पंधरा दिवसाचा वायदा केला जातो असे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत घडत आहे त्यामुळे मार्केट कमिटीने शेतकऱ्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहून व शेतकऱ्यावरील होणारा अन्याय दूर करून अशा व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली पाहिजे असे न झाल्यास नेवासा तालुका सरपंच संघटनेच्या वतीने मार्केट कमिटी कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमुद केले आहे
निवेदन स्वीकारल्या नंतर सचिव देवदत्त पालवे यांनी या बाबत सर्व व्यापाऱ्यांना तात्काळ लेखी नोटीस द्वारे कळविण्यात येईल आणि शेतकऱ्यांच्या वर अन्याय झाल्यास अशा व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करू असे आश्वासन दिले
यावेळी सौंदाळा ग्रामस्थ लक्ष्मण आरगडे उपस्थित होते


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.