नेवासा : मोबाईलच्या युगात सर्वांची कुतूहलाचा आणि उत्सुकतेचा विषय असलेल्या आणि कालबाह्य होत असलेल्या पत्रलेखन आणि संदेशवहन तसेच पोस्ट विभागाचे विविध कामे आणि योजना याबाबत जिल्हा परिषद शाळा नेवासा मुलीच्या विद्यार्थीनींनी प्रत्यक्ष अनुभवातून पत्राचा प्रवास आणि पोस्ट खाते याबाबत नाविन्यपूर्ण उपक्रम द्वारे माहिती घेतली.
सध्या मोबाईल आणि डिजिटल युगात कधी काळी अतिशय प्रचलित असलेले संदेशवहन म्हणजे पत्र! परंतु आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात पत्र आणि पत्रलेखन हे आजच्या विद्यार्थ्यांना आजिबात माहीत नाही.कधी काळी याच पत्राची वाट पाहत अनेकांचा एकेक दिवस व्यथित व्हायचा.

अशा कालबाह्य होत असलेल्या पत्र लेखन आणि पत्राचा प्रवास यावर मुख्याध्यापक अरविंद घोडके मार्गदर्शनाखाली शाळेतील मुलींना पत्र आणि पोस्टाचे काम याबाबत माहिती व्हावी या हेतूने पत्र लेखनचे प्रात्यक्षिक घेण्याचे ठरले.आणि त्यातूनच शाळेतील मुलींनी दिवाळी निमित्त शुभेच्छा पत्र स्वतः लिहून ते पत्र पोस्टात पत्र पेटीत टाकण्याचा अनुभव घेतला.
यावेळी पोस्टात गेल्यानंतर पोस्ट ऑफिसचे श्री.कर्जुले यांनी पोस्टच्या विविध योजना आणि मुलींनी लिहिलेले पत्र कसा प्रवास करून त्यांनी टाकलेल्या पत्त्यावर पोहचेल याची सखोल माहिती दिली.आणि पोस्टाचे बदलत असलेले रूप आणि योजना याची माहिती दिली.

अतिशय नाविन्यपूर्ण आणि मुलींच्या कुतूहलाचा विषय असलेल्या पत्र लेखन व पत्राचा प्रवास याची मुलींना माहिती होऊन दिवाळी निमित्त याच पत्रलेखन मार्फत शाळेतील मुलींनी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी तसेच आपले पालक यांना पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या असून त्यांनी लिहिलेले पत्र आपले अधिकारी आणि पालक यांना कधी मिळेल याबाबत उत्सुक आहेत.
या नाविन्यपूर्ण उपक्रम साठी जिल्हा परिषद शाळा नेवासा मुली शाळेतील मुख्याध्यापक अरविंद घोडके,शिक्षक विठ्ठल कांगुणे,शिक्षक शरद मचे,शिक्षिका वैशाली कुलट,वर्षा जगताप, ज्योती बोरुडे,प्रतिभा पालकर,सुनीता वने यांनी मेहनत घेतली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.