नेवासा – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल व कै. सौ. सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती व युवा प्रेरणास्थान डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या सुरेखा पारखे, पर्यवेक्षिका सुनिता दिघे, ज्येष्ठ अध्यापक सुनील धस, संदीप ढेरे, अनिल भणगे व रोशन सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व विनम्र अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून पाठ्यपुस्तकांचे सामुदायिक वाचन केले. या उपक्रमात विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी उत्साहाने सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी मिसाईलसदृश आकर्षक रचना तयार करून डॉ. कलाम यांच्या कार्याचे स्मरण केले. तसेच ज्येष्ठ अध्यापक सुनील धस लिखित ‘वाचाल तर वाचाल’ या प्रेरणादायी लेखाचे प्रकटवाचन शिक्षक रोशन सरोदे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संजय आखाडे यांनी केले व त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.