ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
तांदूळ

गणेशवाडी – दिवाळी सणानिमित्त काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी रेशनिंग तांदळाचा साठा करुन विक्री करणाऱ्या आरोपीकडुन 450 गोण्या तांदळासह 11,25,000/ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले . त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो.नि किरणकुमार कबाडी यांनी पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार संतोष खैरे, रमिझराजा आत्तार, प्रकाश मांडगे यांचे पथक तयार करुन अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करणे कामी पथकास रवाना केले.

तांदूळ


दिनांक 17 रोजी नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढत असतांना पथकास गोपनिय माहिती मिळाली की, संदिप सुभाष शिंदे रा. भानसहिवरे ता. नेवासा याने भगवान पुंड रा. करजगांव तसेच आजुबाजुचे रेशनिंग दुकादार यांचेकडुन विनापरवाना रेशनिंगाचा तांदुळ खरेदी करुन सदरचा तांदुळ हा संजय अग्रवाल गजानन ऍग्रो करोडी ता.जि.छ.संभाजीगनर येथे विक्री करण्याकरीता त्याचे भानसहिवरे गावातील गोडावुनमध्ये साठवणुक करुन ठेवली असल्या बाबतची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे नेवासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार तसेच पंचासमक्ष भानसहिवरे येथील संदिप सुभाष शिंदे याचे गोडावुनची माहिती काढुन सदर गोडावुन मध्ये जावुन खात्री केली. गोडावुनमध्ये एक इसम बसलेला दिसला.

तांदूळ

सदर इसमास त्याचे नांव पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नांव संदीप सुभाष शिंदे वय – 35 वर्षे रा. भानसहिवरे ता. नेवासा, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गोडावुनचे मालकाबाबत विचारपुस करता त्याने सदरचे गोडावुन हे त्याचे मालकीचे असल्याचे सांगितले. पथकाने सदर गोडावुनची पंचासमक्ष पाहणी केली असता गोडावुनमध्ये असलेल्या गोण्यामध्ये तांदुळ असल्याचे दिसुन आले.या बाबत त्याचेकडे विचारपुस करता त्याने सदरचा तांदुळ हा रेशनिंगचा असुन तो भगवान पुंड रा. करजगांव ता. नेवासा, याचेकडुन तसेच आजुबाजुचे रेशनिंग दुकानदार यांचेकडुन काळ्याबाजारामध्ये खरेदी करुन तो संजय अग्रवाल गजानन ऍग्रो करोडी ता. जि. छ. संभाजीगनर यास विक्री करण्यासाठी घेतलेला असल्याचे सांगितले.सदर गोडावुनची पाहणी केली असता त्यामध्ये 450 गोण्यामध्ये एकुण 22,500/- किलो तांदुळ असा एकुण 11,25,000/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तांदूळ


ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह नेवासा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असुन त्याचेविरुध्द स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस काॅस्टेबल प्रकाश मांडगे यांचे फिर्यादीवरुन गु.र.नं. 899/2025 जिवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच नेवासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार यांनी केली.

तांदूळ

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

तांदूळ
तांदूळ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

तांदूळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *