जेऊर हैबती | समीर शेख – अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती परीसरात कलश सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, जालना आयोजित पीक पाहणी कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी कलश सीड्स चे प्रतिनिधी किशोर परदेशी यांनी शेतकऱ्यांना झेंडू फुलशेती विषयी प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन माहिती दिली. झेंडू फुलाच्या कलश सिड्सच्या येलो सुनील:५४६० व भगवा: १७७९या वाणांविषयी माहिती देत असताना परदेशी यांनी सांगितले की सदर वाणांची कळीधारण क्षमता,फुलांची संख्या,तजेलदार व टवटवीत फुलं हे या वाणांचे विशेष गुण आहेत गेल्या वर्षभरापासून हे वाण कंपनीने विकसित केलेले असून सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.

यावेळी प्रसंगी मार्गदर्शन करताना कलश सीड्स दुसरे प्रतिनिधी अक्षय काळे यांनी शेतकऱ्यांनी या वाणांची लागवड कधी व कशी करावी?काळजी कशी घ्यावी?कमी श्रमात जास्त उत्पन्न देणारं हे वाण आहेत, लोकांनी पारंपारिक पद्धतीने शेती मध्ये पिकं न घेता फुलशेती कडे का वळावे? अशा शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची चर्चेच्या माध्यमातून समाधानकारक उत्तरे देत व खात्रीशीर जास्तीत-जास्त उत्पन्न व फायदा कलश सीड्सच्या या नवीन झेंडूच्या वाणांमुळे नक्कीच शेतकऱ्यांना कसा मिळेल या विषयी सविस्तर मार्गदर्शन प्रतिनिधी अक्षय काळे यांनी केले.
याप्रसंगी कुकाणा येथील सोनल ऍग्रो सीड्सचे मालक प्रमोद काटे यांनी सांगितले की कलश सीड्सच्या झेंडूच्या सदर वाणाचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा,इतरांपेक्षा नक्कीच या वाणाची फुले आकर्षक आणि यांना जास्त भाव मार्केटमध्ये मिळेल अशी आशा व्यक्त केली.

याप्रसंगी कुकाणा येथील गगनगिरी पशुखाद्याचे सर्वेसर्वा निलेशदादा देशमुख, प्रगतशील शेतकरी बाबासाहेब पवार, सुरज पवार, नारायण उगले,सचिन काळे,राजेंद्र एरंडे, विशाल निकम, समीर शेख,अमोल कचरे ,प्रमोद कचरे ,स्वराज कचरे, रवी पवार आदि मान्यवर उपस्थित होते.कंपनीच्या वतीने सर्व प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

