दिनांक १७/१०/२०२५ रोजी एक दिवसीय ईंदुजा महिला मिल्क प्रो. कंपनी च्या वतीने चारा व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम शनि सदन, शनि शिंगणापूर ता.नेवासा येथे उत्साहपुर्वक वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी पशुसंगोपण चारा व्यवस्थापण मुरघास निर्मिती, स्वच्छ दुध उत्पादन, बायोगँस योजना, कुत्रीम रेतन, आदी विषयांवर महिला दुध ऊत्पादकांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला सुमारे ५५० ते ६०० महिला सदस्यांनी हजेरी लावली तसेच कार्यक्रम प्रसंगी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सिकंदर मुलानी साहेब, क्लस्टर हेड श्री. हेमंत वाघ साहेब, श्री.गणेश ढाकणे साहेब , डाँ. वसीम,डाँ श्री. वानखेडे श्री.अविनाश झाडे, श्री. निखिल गवळी श्री.अमर अनपट आदि कंपनीचे सर्व स्टाफ उपस्थित होते.

दिपावली निमित्ताने कंपनीने सर्व महिला दुध ऊत्पादक सभासदांना दोन महिने दिपावली भेट म्हणून ५० किलो बँगचे पशुखाद्य दर ५० रू.प्रमाणे दर कमी करण्याची घोषणा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सिकंदर मुलानी यांनी घोषणा केली.
काही दुध ऊत्पादक महिलांनी आपले मनोगत व्यक्त करतानी सांगितले कि,या अगोदर आमच्या बँक खात्यावर फक्त काही शासनाच्या योजना असेल तरच पैसे जमा होत होते पण ईंदुजा महिला डेअरीला दुध पुरवठा करण्यास सुरवात केल्यापासून पैसे आमच्या बँक खात्यात जमा होत असून दुध उत्पादन महिला सभासदांनमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अमर अनपट व आभार प्रदर्शन श्री.हेमंत वाघ साहेब यांनी केले त्यानंतर सर्व महिला सभासद यांना कंपनी तर्फे स्नेहभोजन करून कार्यक्रम संपन्न झाला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

