शेतरस्ताOplus_0

तालुक्यातील प्रत्येक शेती गटाला मजबूत रस्त्यांच्या माध्यमातून जोडून संपूर्ण तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करणे, हा आमचा संकल्प असल्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी सांगितले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’च्या पहिल्या टप्प्यात ४५ आणि दुसऱ्या टप्प्यात ३०, असे एकूण ७५ शेतरस्त्यांना मंजुरी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

या मंजुरीसाठी आमदार लंघे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता.

विठ्ठलराव लंघे

त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून, पहिल्या टप्प्यात ४५ रस्त्यांना आणि अवघ्या महिन्याभरात दुसऱ्या टप्प्यात आणखी ३० रस्त्यांच्या मजबुतीकरणास मान्यता मिळाली आहे.

या दोन्ही टप्प्यांत मिळून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, मनरेगा योजनेअंतर्गत एकूण ७५ किलोमीटर लांबीचे शेतपाणंद रस्ते तयार होणार आहेत.

चांदा, म्हाळसपिंपळगाव, अंमळनेर, गोणेगाव, गोपाळपूर, माळीचिंचोरा, कौठा, सोनई, शिंगवे तुकाई, शिरसगाव, निंभारी, शिरेगाव, धामोरी बहिरवाडी, सुलतानपूर, पिचडगाव, गणेशवाडी, नेवासा खुर्द, घोगरगाव, फत्तेपूर, सुकळी — या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी सुलभ मार्ग उपलब्ध होणार असून, शेतमालाची सुरक्षित आणि जलद वाहतूक सुलभ होणार आहे.

विठ्ठलराव लंघे

“रस्त्यांशिवाय गावाचा विकास शक्य नाही; त्यामुळे रस्त्यांचे जाळे हेच विकासाचे खरे माध्यम ठरणार आहे,” असे आमदार लंघे यांनी सांगितले.

बहऱ्हाणपूर, पानेगाव, गिडेगाव, गोधेगाव, धनगरवाडी (खामगाव), बेलेकर वाडी, भालगाव, गोपाळपूर, तमासवाडी, निपाणी निमगाव, हंडी निमगाव, बाभूळवेढा, लोहगाव, तेलकुडगाव, उस्थळ दुमाला, जळके खुर्द, पिंप्री शहाली, चिलेखनवाडी, बेलपांढरी, कुकाणा, पानसवाडी, वडाळा, नेवासा बुद्रुक, पुनतगाव, रस्तापूर, लाखेफळ, राजेगाव, टोका – अशा एकूण ४९ गावांचा या योजनेत समावेश आहे.

पुढील काळात तिसरा टप्पा लवकरच जाहीर होणार असून, त्यामध्ये उर्वरित गावांचा समावेश करण्यात येणार आहे.

विठ्ठलराव लंघे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विठ्ठलराव लंघे
विठ्ठलराव लंघे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विठ्ठलराव लंघे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *