सोनई (ता. नेवासा) – येथे दीपावलीनिमित्त उभारण्यात आलेल्या फटाक्यांचे व महालक्ष्मी मूर्तींच्या स्टॉल्सना यशवंत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी सदिच्छा भेट दिली.
स्थानिक महिला भगिनी, कार्यकर्ते आणि तरुण उद्योजकांनी मेहनतीने उभारलेले हे स्टॉल्स पाहून गडाख यांनी समाधान व्यक्त केले. “हा सामाजिक सहभाग आणि स्थानिक उद्यमशीलतेचा सुंदर नमुना आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

सोनई व परिसरातील मित्रपरिवारासह खरेदीचा आनंद घेत गडाख यांनी सर्व विक्रेत्यांना शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व नागरिकांना त्यांनी प्रेमळ दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि “ही दिवाळी नवउमेद, नवचैतन्य आणि एकात्मतेची असो,” अशी मनोभावे प्रार्थना केली.
या भेटीदरम्यान अनेक तरुण कार्यकर्ते, स्थानिक उद्योजक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

