मारहाण

नेवासा- सोनईत जुन्या वादाचा राग धरून एका युवकास लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यात ११ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात सुटीवर गेलेल्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना हजर करून गावात दंगल नियंत्रण पथक कार्यरत करण्यात आले आहे.

शनिवारी (ता. १९) रात्री आठ वाजता एका रुग्णालयासमोर संजय ऊर्फ गोंड्या नितीन वैरागर यास हाताने व लाकडी दांड्याने हात, पाय व तोंडावर बेदम मारहाण करण्यात आली. नितीन केशव वैरागर यांनी फिर्याद दिल्यानंतर संभाजी लांडे, राजू मोहिते, गणेश चव्हाण, विशाल वने, महेश दरंदले, शुभम मोरे, अक्षय शेटे, नितीन शिंदे, स्वप्नील भळगट, हासने (नाव माहीत नाही) व संभाजी लांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मारहाण

घटना झाल्यानंतर नातेवाईकांनी जखमी युवकास पोलिस ठाण्यात आणले. सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी यांच्यासमोर ठेवून आरोपीस अटक करण्याची मागणी केली. आवारात मोठा जमाव जमल्याने वातावरण तणाव निर्माण झाला होता. मारहाण करणे गैर असल्याने रितसर कारवाई होत असताना जखमीस टेबलावर ठेवून गोंधळ घातल्याबद्दल वरिष्ठांना कळविण्यात आल्याचे फौजदार सूरज मेढे यांनी सांगितले. नितीन शिंदे यास अटक करण्यात केली आहे श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षकांचे एक, तर सोनई पोलिस ठाण्याचे तीन पथक आरोपींचा शोध घेत असल्याचे माळ यांनी सांगितले. दंगल नियंत्रण पथक, दोन अधिकारी व ३६ पोलिस कर्मचारी बंदोबस्तात कार्यरत केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. बेदम मारहाण व अॅट्रासिटीचा गुन्ह दाखल करण्यात आल्याने अधिक तपास कर्जतचे पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे तपास करत आहेत.

newasa news online
मारहाण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मारहाण
मारहाण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मारहाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *