नेवासे शहरातील स्वातंत्र्यकालीन ऐतिहासिक मोहिते चौकात झेंडावंदन पटांगणावर जवानांच्या स्मरणार्थ व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यासाठी “एक पणती जवानांसाठी “ हा कार्यक्रम दिवाळीनिमित्त घेण्यात आला. अॅड. अक्षय मोहिते यांच्या संकल्पनेतून आझाद हिंद मित्र मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे हे नववे वर्ष होते. या कार्यक्रमाला सर्वधर्मीय नागरिकांडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी सैनिक,माजी सैनिक व पोलीस बांधवांचा ही सन्मान करण्यात येऊन त्यांना मानवंदना देण्यात आली.
आजकालची लढाई देशाच्या सीमेवर नाही तर देशामध्ये विविध ठिकाणी होत आहे. जोपर्यंत नागरिकांमध्ये याबाबत जागृती होत नाही, तोपर्यंत लढाई थांबणार नाही. त्यामुळे जवानांचे कार्य व त्यांच्या प्रती आदर व्यक्त करतांना समाज जागृतीसाठी “एक पणती जवानांसाठी “ हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे प्रतिपादन अॅड. अक्षय मोहिते यांनी केले.

जवानांची भारत मातेच्या प्रति त्यागाची व बलिदानाची भावना आहे. ज्या देशांत जवानांप्रती सद्भावना असते. तो देश नेहमीच प्रगती पथावर असतो देशाचा रक्षणकर्ता जवान आहे. सीमेवर लढणारे जवान हे शौर्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. जवान आणि शौर्य या दोन वेगळ्या गोष्टी नसून एकच आहेत. महाराष्ट्रात सैनिकी परंपरा आहे. देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांमागे त्यांच्या पत्नी आई आणि बहिणींसह संपूर्ण कुटुंब असते. त्यांच्या पाठिंब्यावर ते लढाई लढू शकतात अशी भावना अॅड. अक्षय मोहिते यांनी मांडत प्रास्ताविक केले व देशाप्रती शहिद झालेल्या जवानांना मानवंदना दिली.
स्वातंत्र्योत्तर काळात या ऐतिहासिक झेंडावंदन पटांगणात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मोठ्या नेत्यांच्या सभा होत असत. अच्युतराव पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन, काकासाहेब गाडगीळ, साने गुरुजी, पत्री सरकारचे क्रांतिसिंह नाना पाटील अशा नेत्यांच्या सभा येथे झाल्या होत्या.
नेवाशातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनी येथे ध्वजस्तंभाची स्थापना करून तिरंगा उभारला व १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून या ठिकाणी २६ जानेवारी व १५ ऑगस्टला ध्वजारोहण केले जाते व ती परंपरा आजही सुरु आहे. “एक पणती जवानांसाठी” कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मेजर जगदीश ढगे, अरुण फाटके, ज्ञानेश्वर बर्डे, देविदास कराळे, रमेश काकडे, अरुण इखे, संदीप कराळे, बाबासाहेब वैद्य, गोरखनाथ गिऱ्हे, बाबासाहेब आवारे, अशोक राजळे, अण्णासाहेब पटारे, आप्पासाहेब पिंपळे, चंद्रकांत कडू, रघुनाथ मैंदाड, शुभम शिंदे, पंढरीनाथ भोरे या आजी-माजी सैनिकांसह, वीरपत्नी सरिता कराळे, कल्पना इखे सेवानिवृत्त नायब तहसीलदार चंद्रकांत कांदे यांच्यासह नेवासा येथील प्रेस क्लबच्या सदस्य पत्रकारांचा सन्मान सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व जवानांनी देशसेवेविषयी आपल्या भावना, सीमेवरील आपले अनुभव व्यक्त केले.

दीपप्रज्वलन धुळे येथे कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले व भारतमातेचा जयजयकार करीत राष्ट्रगीताने सांगता झाली. दिवाळीनिमित्त आयोजक अॅड. अक्षय मोहिते यांच्या संकल्पनेतून देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानांचा तसेच पोलीस बांधवांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला रम्हूशेठ पठाण, डॉ. नितीन करवंदे, डॉ. स्वप्निल बल्लाळ, डॉ.करण घुले, डॉ. सुजित मोटे, डॉ. निलेश लोखंडे, डॉ. संजय सुकाळकर, विजय कावरे, उदयकुमार बल्लाळ, माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे, ना. तहसिलदार चंद्रकांत कांदे, प्रा. रमेश शिंदे, अॅड. राहुल मुंगसे, अॅड. भैय्या काझी, अॅड. शेखर गव्हाणे, अॅड. महेश जामदार, पत्रकार सुधीर चव्हाण, मकरंद देशपांडे, सतीश गायके, प्रशांत कानडे,अभय मोहिते, रज्जाक शेख, सलीम देशमुख, संदीप मोहिते, अजमत पठाण, शंकर अंबिलवादे,

सुभाष मोहिते, असिफ पठाण, रुपेश उपाध्ये, सज्जू पठाण, सागर शिंदे, खाजा मणियार, किरण अंबिलवादे, असिफ देशमुख, प्रमोद देशपांडे, राजेंद्र देशमुख, नितीन सराफ, श्रावण सरकाळे, रामभाऊ गव्हाणे, प्रसाद पाटील, इरफान कुरेशी, वैभव कोंडेजकर, विजय अंबिलवादे, दत्तात्रय जोशी, अनिल बडवे, सतीश उपाध्ये, विठ्ठल लोखंडे, हुसेन शेख, मोहन शिंदे, अल्ताफ आतार, सुभाष घोरपडे, प्रशांत देशमुख, अनिल शिंदे, प्रशांत सुडके, रणजित राजेभोसले, अदिती राजेभोसले, ओम देशपांडे, दीपक निंबाळकर, ज्ञानेश्वर डौले, सचिन धनक, मयूर देवचक्के, विनायक आंबिलवादे, अबू देशमुख, पदु देशमुख,अनिस देशमुख, यश मोहिते, यश उपाध्ये आदीं नागरिकांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सुत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले तर अॅड. अक्षय मोहिते यांनी आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

